मुंबई 24 सप्टेंबर: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणाने आता गंभार वळण घेतलं आहे. दीपिका पदुकोण ड्रग्ज घेत असल्यानेच डिप्रेशनमध्ये गेली होती, बॉलिवूडमध्ये 95 टक्के लोक ड्रग्ज घेतात असा खळबळजनक खुलासा अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला आहे. शर्लिन म्हणाली, मी ज्या पार्टीत होते तिथे अनेकजण कोकेन घेत होते. त्या सगळ्यांची नावे NCBला सांगायला मी तयार आहे. बॉलीवूडची कुठलीही पार्टी ही ड्रग्ज शिवाय होत नाही. जर सारा, दीपिका यांची चौकशी झाली तर खूप मोठी नावं समोर येतील असंही तिने सांगितलं. जया बच्चन यांना माझी विनंती आहे की त्यांनी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहनही तिने केलं. शर्लिन पुढे म्हणाले, मला NCB ने बोलावलं तर मी चौकशीसाठी जायला तयार आहे. कधीकाळी मी पण चेन स्मोकर होते, ऑक्टोबर 2017 मध्येच मी ते सगळं सोडून दिलं. बॉलीवूडमधली लोकं जशी दिसतात तशी नसतात असे सूचक उद्गारही तिने काढले. दरम्यान, सांगितले जात आहे की अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोच्या (NCB) रडारवर कमीत कमी 50 हून अधिक सेलिब्रिटी आहेत. यामध्ये बड्या निर्मात्यांबरोबरच दिग्दर्शकांचाही समावेश आहे. अमली पदार्थाबाबत तपास करीत असलेल्या एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोनसह श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि अन्य जणांचा चौकशीसाठी समन्स पाठविला आहे. एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकलेली अबिगेल पांडे TOPLESS YOGA मुळे आधी होती चर्चेत एनसीबीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की पादुकोनला शुक्रवारी चौकशीसाठी बोलाविण्यात आलं आहे. एनसीबीच्या तपासादरम्यान D N S K अशी नावं समोर आली आहे. त्यामुळे आता एनसीबी त्या दिशेनं आपला तपास सुरू आहे. D म्हणजे बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि K म्हणजे तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश. दीपिकाचे करिश्मासोबत ड्रग्जसंबंधी चॅट समोर आले आहेत. त्यामुळे करिश्मा आणि दीपिका दोघांचीही चौकशी केली जाणार आहे. 25 सप्टेंबरला दीपिकाची चौकशी होणार आहे. अबिगेल पांडे, सनम जौहरच्या घरात सापडले ड्रग्ज; आता टीव्ही कलाकारही NCB च्या रडार ड्रग्ज प्रकरणात सारा अली खानचं नावही समोर आलं. सारा एका हाय प्रोफाइल ड्रग पेडलरच्या संपर्कात होती. ज्याचा एनसीबी शोध घेत आहे. सुशांतने सारासह केदारनाथ फिल्ममध्ये काम केलं होतं. रियाने आपल्या जबाबात सांगितलं की, केदारनाथ चित्रपटादरम्यान सुशांत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत होता. त्यापूर्वीही तो ड्रग्ज घेत होता, मात्र त्यानंतर त्याला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं.एनसीबीने आता साराला 24 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे.