रित्विक धनजानी (Rithvik Dhanjani) चे काही फोटो सध्या चर्चेत आहेत. मोनिका डोगरा (Monica Dogra) बरोबरचे त्याचे फोटो पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.
'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) फेम रित्विक धनजानी (Rithvik Dhanjani) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मालिकेतील त्याची सहकलाकार आशा नेगी (Asha Negi) आणि रित्त्विकने दीर्घकाळासाठी डेट केले होते, नुकतेच त्यांनी त्यांच्या ब्रेकअप बद्दल जाहीर केले. मात्र त्यांच्यातील मैत्री कायम असल्याचे त्यांनी सांगितले होते. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम/@monicadogra/ritvik_d)
रित्विक धनजानी (Ritvik Dhanjani) चे काही फोटो सध्या चर्चेत आहेत. मोनिका डोगरा (Monica Dogra) बरोबरचे त्याचे फोटो पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. . (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम/@monicadogra)
मोनिका डोगराने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. तिने यामध्ये रित्त्विकला सगळ्यात चांगला मित्र म्हटले आहे . (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम/@monicadogra)
फोटो शेअर करताना मोनिकाने एक मोठी लांबलचक कॅप्शन दिली आहे. ज्यामध्ये तिने रित्त्विक आणि तिच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले आहे. या पोस्ट मध्ये ती रित्त्विकने कौतुक करताना थकली नाही आहे . (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम/@monicadogra)
आशा आणि रित्त्विक टेलिव्हिजन मधील फेव्हरिट कपल होतं. त्यांच्या ब्रेकअपमुळे अनेकांना धक्का बसला होता. दरम्यान हे रित्त्विक आणि मोनिकाचे फोटो समोर आल्यानंतर ते दोघ डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. लोकं त्यांच्या फोटोवर कमेंट करून हाच सवाल विचारत आहेत की ते दोघं डेट करत आहेत का . (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम/@rithvik_d)
त्यांच्याबाबत अशी चर्चा होण्याचे आणखी एक कारण म्हणजे मोनिकाने कॅप्शनमध्ये रित्त्विकला I love you देखील म्हटले आहे. मोनिका डोगरा एक प्रसिद्ध म्युझिशिअन आणि अभिनेत्री आहे. तिने काही चित्रपटात काम केले आहे. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम/@rithvik_d)
दरम्यान चाहत्यांच्या कमेंट्स वरून असे वाटते आहे की त्यांना मोनिका आणि रित्त्विकच्या जोडीऐवजी आशा-रित्त्विक हीच जोडी अधिक आवडते आहे. दोघांना पुन्हा एकत्र पाहता यावे, अशी मागणी चाहते करत आहेत. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम/@rithvik_d)