राम गोपाल वर्मा
मुंबई, 8 डिसेंबर : बॉलिवूड चे प्रसिद्ध डायरेक्टर राम गोपाल वर्मा कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चर्चेत असतात. सध्या ते त्यांचा आगामी चित्रपट ‘डेंजरस’ मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 9 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात धडकणार आहे. या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु असून चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच राम गोपाल वर्मा यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र या व्हिडीओमुळे ते जोरदार ट्रोल होत असून नेटकरी त्यांचं कृत्य किळसवाणं असल्याचं म्हणत आहे. राम गोपाल वर्मा आगामी चित्रपट डेंजरसचं प्रमोशन अभिनेत्री आशु रेड्डीसोबत करत आहेत. याचा एक व्हिडीओही समोर आलाय. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, दोघांची एक मुलाखत व्हायरल होत आहे ज्यामध्ये राम गोपाल वर्मा आशुसोबत जोरदार फ्लर्ट करताना दिसत आहेत. आणि मुलाखतीच्या शेवटी तो अभिनेत्रीच्या पायाची मालिश करताना दिसत आहे त्यानंतर पायाला किस घेताना दिसत आहे. एवढंच नाही तर राम गोपाल वर्मा यांनी अभिनेत्री पायच तोंडात घातला. हे पाहून नेटकरी सध्या त्यांना जोरदार ट्रोल करत आहे.
राम गोपाल वर्माच्या या पोस्टवर युजर्स कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले की, ‘रामू सरांना असे पाहताना मला वाईट वाटते, एकेकाळी ते भारतीय चित्रपटसृष्टीचे सर्वोच्च दिग्दर्शक होते, ज्यांच्यासोबत सर्व मोठे कलाकार काम करायचे होते.’ दुसऱ्याने लिहिले, ‘हे काय रामू, तू असा नव्हतास, उठ.’ हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, ‘डेंजरस’ देशातील पहिला लेस्बियन चित्रपट आहे, ज्यामध्ये दक्षिण चित्रपटांच्या प्रसिद्ध अभिनेत्री आशु अप्सरा राणी आणि नैना गांगुली मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट राम गोपाल वर्माच्या सर्वात वादग्रस्त चित्रपटांपैकी एक आहे, जो अनेक वादानंतर अखेर 9 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. याआधी वादांमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती पण आता तो चित्रपटगृहात दाखल होणार आहे.