मुंबई, 25 मार्च : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी भारतात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. सर्वसामन्यांपासून दिग्गज लोकही यामुळे घरात बंदिस्त राहिले आहेत. दरम्यान, बॉलिवूड कलाकार, सेलिब्रेटी जनजागृती करत आहेत. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असेलेले बिग बी अमिताभ बच्चन यांनीही आतापर्यंत अनेक अपडेट शेअर केले आहेत. यातच त्यांनी ट्विट करून सल्ला दिला आहे. कोरोनामुळे रुग्णालये कमी पडल्यास रुग्णांवर कसे उपचार करता येतील यावर एक उपाय त्यांनी शेअर केला आहे. बिग बींनी एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये एका युजरने त्यांना दिलेली एक आयडिया आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर म्हटलं की, माझ्या मते ही एक फायद्याची कल्पना आहे. मला इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीनं सांगितली. यासोबत बच्चन यांनी एक स्क्रीनशॉट टाकला आहे.
स्क्रीनशॉटमध्ये लिहिलं आहे की, एक अशी आयडिया जी सरकारला, प्रशासनाला पाठवता येईल. सध्या सर्व रेल्वे सेवा बंद आहेत. त्यामुळे रेल्वेचे डबे जाग्यावरच उभा आहेत. प्रत्येक बोगीत 20 खोल्या आहेत. त्यांचा वापर करता येऊ शकतो. अशा 3000 रेल्वे असून त्यात 60 हजार खोल्यांतून लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवता येईल. रुग्णालय नसतील तर याचा वापर करता येऊ शकतो. याआधी अमिताभ बच्चन यांनी भारताच्या कोरोना डॅशबोर्डबाबत ट्विट केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, कोरोना व्हायरसबाबत अपडेट देणारी ही अधिकृत वेबसाइट आहे. ही वेबसाइट दर चार तासांनी अपडेट होते आणि यात भारताच्या प्रत्येक राज्यात कोरोनाच्या रुग्णांची माहिती अपडेट केली जाते. हे वाचा : हृतिकच्या घरी रहायला आली EX Wife, कोरोनाचा असाही परिणाम