JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / CORONA LOCKDOWN : पाहा तुमच्या फेव्हरेट अभिनेत्री सध्या घरात काय करतायेत?

CORONA LOCKDOWN : पाहा तुमच्या फेव्हरेट अभिनेत्री सध्या घरात काय करतायेत?

Corona lockdown : राज्यात कामाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. बहुतेक जण घरीच आपला वेळ घालवत आहे. अशात बॉलिवूड सेलिब्रिटी आपला वेळ कसा घालवत आहेत, पाहा.

0105

सध्या राज्यात संचारबंदी आहे. कामाशिवाय बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश लोक घरीच वेळ घालवत आहेत. यात सेलिब्रिटींचाही समावेश आहे. बॉलिवूड अभिनेत्री या कालावधीत घरी राहून नेमकं काय करत असतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना.

जाहिरात
0205

मलाइका अरोरा - अभिनेत्री मलाइका अरोरा ही रोजच तिच्या फिटनेस सेंटरजवळ दिसायची. मात्र लॉकडाऊनमुळे तीदेखील घरूनच काम करत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने वर्क फ्रॉम होम असं कॅप्शन लिहित फोटो पोस्ट केला होता.

जाहिरात
0305

सारा अली खान - सारादेखील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर घरीच वेळ घालवताना दिसली. नुकताच तिने तिच्या घराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा लॉकडाऊनचा वेळ तिने या कामासाठी खर्च केला.

जाहिरात
0405

कतरिना कैफ - अभिनेत्री कतरिना कैफ काहीच दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर तिने काही स्वत:ला होम क्वारंटाइन करत काही दिवस उपचार घेतले. आठवडाभरानंतर ती कोरोनामुक्त झाली आहे. संपूर्ण वेळ ती घरातच असल्याने सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह असायची.

जाहिरात
0505

करीना कपूर खान - अभिनेत्री करीना कपूर नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये ती कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे. नुकताच तिने मुलांसोबत सैफचा एक फोटो पोस्ट केला होता. ज्यात तिने आपल्या बाळाचा चेहरा मात्र दाखवला नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या