JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / GoodBye 2020 : Corona आणि लॉकडाऊन पेक्षाही या 10 वादग्रस्त घटनांनी हादरलं बॉलिवूड

GoodBye 2020 : Corona आणि लॉकडाऊन पेक्षाही या 10 वादग्रस्त घटनांनी हादरलं बॉलिवूड

2020 या वर्षात बॉलिवूडला अनेक उतार-चढावांना सामोरं जावं लागलं. अनेक सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात सापडले.या वर्षातील बॉलिवूडच्या विश्वातला घेतलेला हा आढावा.

0110

सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या ही बॉलीवूडसाठी सर्वात मोठा वादंग होता. जेव्हा देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत होती आणि देश लॉकडाऊनमधून जात होता, तेव्हा अचानक सुशांतच्या मृत्यूने सर्वांना धक्का दिला. सुशांतने मुंबईत आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या बातमीनं देशाला एक जबरदस्त धक्का दिला होता. त्यानंतर सुशांतच्या आत्महत्येला सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती कारणीभूत असल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबियांनी केला. त्यानंतर तब्बल दोन महिन्यापेक्षा जास्त काळ रिया चक्रवर्ती राष्ट्रीय बातम्यांचा विषय होती. याप्रकरणात पुढे सीबीआय चौकशी झाली आणि सुशांतच्या मृत्यूसाठी रिया कारणीभूत नसल्याचं समोर आलं.

जाहिरात
0210

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडच काय देशभरातील त्याचे फॅन्स हादरुन गेले. त्यातून समोर आलेल्या ड्रग अँगलमुळे अनेक बड्या सेलिब्रिटींना सरकारी चौकशीला सामोरं जावं लागलं. सुशांतची गर्लंफ्रेड रिया चक्रवर्तीवर सुशांतला ठार करण्याचे आरोप करण्यात आले. तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला ड्रग्जच्या केसमध्ये पडकण्यात आलं. दीपिका पादुकोण, सारा अली खान, रिया चक्रवर्ती, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह, भारती सिंह अशा अनेक सेलिब्रिटींची चौकशी झाली.

जाहिरात
0310

एकीकडे ड्रग्ज प्रकरण तर दुसरीकडे नेपोटिझम अशा दोन्ही चर्चांमध्ये बॉलिवूड अडकलं. अनेक कलाकारांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला.

जाहिरात
0410

कंगना रणौत आणि तिची वादग्रस्त वक्तव्य यावर्षीचा हॉट टॉपिक ठरला. सुरूवातीला कंगनाने बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांवर आरोप केले. त्यानंतर मुंबईला पीओकेची उपमा दिली त्यामुळे कंगनाविरोधात वातावरण चांगलंच तापलं. काही महिन्यांपूर्वी बीएमसीने कंगनाचं ऑफिस तोडलं. ज्या अवैध असं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं.

जाहिरात
0510

कंगना रणौतने यावर्षी राजकारणी असो, सेलिब्रिटी असो अनेकांशी पंगा घेतला. शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या एका म्हताऱ्या महिलेले वर कंगनाने अक्षेपार्ह टिप्पणी केली. त्याला दिलजीत सिंह दोसांझने तिखट शब्दात उत्तर दिलं. मग शांत बसतेय ती कंगना कसली? … कंगना आणि दिलजीतचं ट्विटरवॉर चांगलंच रंगलं.

जाहिरात
0610

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सोनू निगमनेही एका व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमधील त्याच्या वक्तव्यांमुळे कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली होती. बॉलिवूडच नाही तर म्युझिक इंडस्ट्रीवरही त्याने आरोप केले.

जाहिरात
0710

करण जोहर आणि मधुर भांडारकर यांच्यात एका वेब सीरिजच्या नावावरुन वाद झाले. मधुर भांडारकरच्या सिनेमाचं नाव आणि करण जोहरच्या द फॅब्यूलस लाइफ ऑफ बॉलीवूड वाइफ्स जवळजवळ सारखंच असल्यामुळे त्यांच्यात ट्विटर वॉर रंगलं होतं.

जाहिरात
0810

बॉलिवूडच्या ड्रग्जचा विषय संसदेतही गाजला. रवि किशन आणि जया बच्चन यांच्या ड्रग्ज प्रकरणावरुन संसदेत वाद झाले.

जाहिरात
0910

दिल्लीमध्ये जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामध्ये दीपिका पादुकोन गेल्यामुळे तिला टीकेचा सामना करावा लागला. बॉयकॉट छपाक हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. सडक 2 या चित्रपटाच्या युट्यूबवरील ट्रेलरवर डिस्लाइक्सचा पाऊस पडला.

जाहिरात
1010

आश्रम या वेब सीरिजवर लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला. तर अ सुटेबल बॉय या सीरिजमधील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या