JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / वडिलांना शेवटचा निरोप देत सोशल मीडियावर व्यक्त झाली राजू श्रीवास्तवची लेक,म्हणाली....

वडिलांना शेवटचा निरोप देत सोशल मीडियावर व्यक्त झाली राजू श्रीवास्तवची लेक,म्हणाली....

लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं नुकतंच दुःखद निधन झालं. दिवंगत कॉमेडियनचे अंत्यसंस्कारही दिल्लीत झाले. आपल्या आवडत्या स्टँड-अप कॉमेडियनच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देश दु:खी झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 सप्टेंबर : लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं नुकतंच दुःखद निधन झालं. दिवंगत कॉमेडियनचे अंत्यसंस्कारही दिल्लीत झाले. आपल्या आवडत्या स्टँड-अप कॉमेडियनच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देश दु:खी झाला आहे. सर्वांना हसवणारे राजू श्रीवास्तव कायमचे नि:शब्द झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली दिली जात आहे. अशातच राजू श्रीवास्तव यांच्या मुलीने एक पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रेमाविषयी आभार मानले आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. राजू श्रीवास्तव यांचे मित्र, चाहते सगळेचजण त्यांच्या कुटुंबाला आधार देत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचं सांगत आहेत. या मिळणाऱ्या प्रेमाबद्दल राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतराने सगळ्यांचे आभार मानले आहेत.

राजू श्रीवास्तव यांच्यावर आज म्हणजेच गुरुवारी दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांनी रडलेल्या डोळ्यांनी निरोप घेतला. उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री सुनील पाल, मधुर भांडारकर हे देखील स्मशानभूमीत पोहोचले आहेत. लोक राजू श्रीवास्तव अमर रहेच्या घोषणा देत आहेत. हेही वाचा -  Raju srivastava Video: राजू श्रीवास्तव यांनी आधीच केला होता यमराजचा उल्लेख; मृत्यूनंतर ‘तो’ VIDEO VIRAL दरम्यान, राजू श्रीवास्तव यांचे 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10.20 वाजता निधन झाले. तब्बल 42 दिवस मृत्यूशी झुंज देणारे राजू श्रीवास्तव अखेर ही लढाई हरले. त्यांच्या जाण्यानं सगळीकडे शोककळा पसरली आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तव पंचतत्वात विलीन झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या