कलर्स मराठीवरील (Colors Marathi) लेक माझी दुर्गा (Lek Majhi Durga) मालिकेतील दुर्गाच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री वरदा पाटील (varda Patil) हिने अचानक मालिकेतून एक्झिट घेतली. मालिका सोडल्यानंतर वरदाने पोस्ट लिहीली आहे. काय म्हणालीय वरदा तिच्या पोस्टमध्ये जाणून घ्या.
मालिकेत आता अभिनेत्री 'रश्मी अनपट' ही दुर्गाची भूमिका साकारणार आहे. लग्नाच्या एपिसोडमध्ये नव्या दुर्गाची मालिकेच एंट्री झाली आहे.
लेक माझी दुर्गा मालिकेतून दुर्गाची भूमिका साकारुन अभिनेत्री वरदा पाटील घराघरात पोहोचली होती. पण तिनं अचानक मालिका सोडल्यानं तिच्या चाहत्यांना धक्का बसलाय.
वरदानं मालिकेतील दुर्गाच्या हळदीचा अल्बम शेअर करत 'मी दुर्गाला खरंच मिस' करत असल्याचं सांगितलं.
तसंच वरदा हिनं सगळ्यांचे आभार मानत लिहिलंय, 'तुम्ही सगळ्यांनी दुर्गा वर इतकं प्रेम केलत त्यासाठी तुम्हां सगळ्यांचे खूप खूप आभार. असंच प्रेम राहु द्या'.
वरदाने लेक माझी दुर्गा ही मालिका सोडली असली तरी लवकरचं नव्या भूमिकेत भेटायला येणार आहे असंही तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अभिनेत्री वरदा पाटील हिने साकारलेली दुर्गा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तिच्या पोस्टवर अनेकांनी आम्हीही तुला मिस करतोय, असं म्हटलंय. अनेकांनी तिला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देखील दिल्यात.
लेक माझी दुर्गामध्ये आलेली नवी दुर्गा म्हणजेच अभिनेत्री रश्मी अनपटही फार सुंदर आणि प्रामाणिक अभिनेत्री आहे. रश्मी आता दुर्गा कशी साकारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.