JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सेक्ससाठी केली जबरदस्ती..' प्रसिद्ध कोरिओग्राफर विरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा

'सेक्ससाठी केली जबरदस्ती..' प्रसिद्ध कोरिओग्राफर विरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा

प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि डान्सर गणेश आचार्य पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. एका महिला सीनिअर बॅकग्राउंड डान्सरने गणेश आचार्यवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी आचार्यवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,5 फेब्रुवारी: प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि डान्सर गणेश आचार्य पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. एका सीनिअर बॅकग्राउंड महिला डान्सरने गणेश आचार्यवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी गणेश विरोधात तक्रार दाखल केली आहे. मुंबई पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेऊन आचार्यविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. गणेशविरोधात दाखल झालेली ही दुसरी तक्रार आहे. काही दिवसांपूर्वी देखील गणेश आचार्यवर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी गणेश आचार्यवर एका महिला कोरिओग्राफरने अॅडल्ड व्हिडीओ बघायला जबरदस्ती केल्याचा केला होता. आता आणखी एका बॅकग्राउंड डान्सरने शारीरिक संबध ठेवण्यास जबरदस्ती केल्याचा आरोप आचार्यवर केला आहे. या महिलेने महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. आंबोली पोलिस स्टेशनमध्ये गणेश आचार्यविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

गणेश आचार्यने मात्र लैंगिक शोषणाचा आरोप फेटाळला आहे. याआधीही गणेश आचार्यने त्याच्यावर करण्यात आलेले आरोप नाकारले होते. आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे गणेश आचार्यने म्हटले आहे. महिलेने तक्रारीमध्ये असं म्हटलं आहे की, ‘1990 मध्ये गणेश आचार्यने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली होती. 30 वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. माझं लग्न झालं आहे आणि मला मुलंही आहेत, तरीसुद्धा त्याच्या वागण्यात काही बदल झाला नव्हता.’ याआधी ज्या महिलेने गणेश आचार्यवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता, तिने देखील काही गंभीर आरोप केले होते. गणेश आचार्यने अश्लील व्हिडीओ पाहण्यास भाग पाडल्याचा आरोप या महिलेने केला होता. गणेश आचार्यविरोधात या दोन महिलांनी पुढे येत तक्रार केल्यामुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा #metoo बाबत चर्चा रंगली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या