चारु असोपा, राजीव सेन
मुंबई, 25 ऑक्टोबर : टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आणि राजीव सेन वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्यात ब्रेकअप-पॅचअप सुरु आहे. त्यामुळे त्यांचे चाहतेही त्यांच्या नात्याविषयी चिंतेत असल्याचं दिसून येत आहेत. चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या वैवाहिक जीवनातील अडचणी संपताना दिसत नाहीत. चारु आणि राजीवच्या चाहत्यांसाठी आता धक्कादायक अपडेट समोर आली आहे. यावेळी गोष्टी इतक्या पुढे गेल्या की चारू असोपा आणि राजीव सेन यांनी कायमचे वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ETimes ला दिलेल्या मुलाखतीत चारू असोपाने तिच्या लग्नाबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. चारु म्हणली, ती लवकरच राजीव सेनसोबत घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करणार आहे. फक्त राजीवने गोंधळ न करता ते मान्य करावे अशी तिची अपेक्षा आहे. ‘उद्या ते संपवायचे आहे या हेतूने कोणीही लग्न करत नाही. माझे लग्न संपवण्याच्या निर्णयाबद्दल मला पश्चात्ताप करायचा नव्हता. त्यामुळे हे लग्न वाचवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले. कारण हे माझे दुसरे लग्न आहे. या सगळ्यात माझीच चेष्टा केली जात होती. माझा तमाशा झाला आहे. मला वाटते की आम्ही एकमेकांसाठी बनलेले नाही. हे लग्न कधीच चालणार नाही.’ हेही वाचा - Diwali 2022: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नयनताराने दाखवली आपल्या जुळ्या मुलांची झलक; सुपरक्युट VIDEO VIRAL अखेर चारू असोपा यांनी राजीव सेनला घटस्फोट घेण्याचे कारण काय? चारूने सांगितले की, ‘खरे कारण म्हणजे राजीव प्रत्येक भांडणानंतर गायब होतो. ती म्हणाली, ‘आम्ही लग्न केल्यापासून सतत भांडत होतो. आमच्यात भांडण किंवा वाद झाला की राजीव गायब व्हायचा, कधी आठवडे, कधी महिने. भांडणानंतर राजीव त्याच्याशी संबंध ठेवण्याचे सर्व मार्ग बंद करत असे. लॉकडाऊनच्या काही दिवस आधीही तो मला तीन महिन्यांसाठी सोडून गेला होता. तो आता 45 वर्षांचा आहे आणि मी त्याला बदलू शकत नाही. आमच्यात बरेच मतभेद आहेत, पण मला आशा होती की मुलगी जियानासाठी कदाचित सर्व काही ठीक होईल. दुर्दैवाने तसे झाले नाही.’ चारू सांगते की शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे हा राजीवचा स्वभाव आहे. राजीवबद्दल बोलताना चारू म्हणते, ‘त्याने माझ्याशी गैरवर्तन केले आहे. त्याने एक-दोनदा माझ्यावर हातही उचलला आहे. त्याला वाटले की मी त्यांची फसवणूक करत आहे. अकबर का बाल बिरबलच्या शूटिंगदरम्यान राजीवने चारूच्या सहकलाकारांनाही त्याच्यापासून दूर राहण्यास सांगितले.
पूर्वीप्रमाणे मी कोणतीही पोटगी मागितलेली नाही. मला हे लग्न यापुढे ओढायचे नाही. यात मी आधीच साडेतीन वर्षे वाया घालवली आहेत, असंही चारु म्हणाली.