अभिनेत्री मृण्मयी देशपांडे’ (Mrunmayee deshpande) सध्या तिच्या सिनेमांमुळे चांगलीच चर्चेत आहे. ‘चंद्रमुखी’ ( Chandramukhi) आणि ‘शेर शिवराज है’ (Sher Shivraj Hai) या दोन बॅक टू बॅक सिनेमातून मृण्मयी प्रेक्षकांच्या भेटील आली. पण सध्या मृण्मयीला चंद्राची भुरळ पडल्याचं दिसून येतंय. त्यासाठी पाहा तिचं लेटेस्ट फोटोशूट
चंद्रमुखी सिनेमात मृण्मयीने साकारलेली 'डॉली'तर कायम प्रेक्षकांच्या मनात राहणार आहे.
कपाळी चंद्रकोर, साडीवर चंद्रकोर अन् नाकात नथ देखील चंद्राची... मृण्मयीने तिच्या फोटोशूटनं सर्वांचं लक्ष वेधलंय.
सोनेरी ब्लाऊज त्यावर चंद्राकोराची चॉकलेटी साडी... आहा मृण्मयी या मराठमोळ्या लुकमध्ये फारच सुंदर दिसतेय.
चंद्रमुखी सिनेमात मृण्मयीने 'दमयंती (डॉली ) दौलतराव देशमाने' ही भूमिका अचूक निभावली आहे.