JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / The Kapil Sharma Show मधून आणखी एका कलाकाराची एक्झिट, समोर आलं कारण

The Kapil Sharma Show मधून आणखी एका कलाकाराची एक्झिट, समोर आलं कारण

कपिल शर्मा शोमधील आणखी एका कलाकाराची एक्जिट झाल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे शोविषयी पुन्हा कलाकारांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

जाहिरात

kapil sharma show

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 सप्टेंबर : सगळ्यांना खळखळून हसवणारा लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. हा कॉमेडी शो टीव्हीवर पुनरागमन करणार असून शोचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे सध्या या शोविषयी नवनवीन माहिती समोर येत असलेली पहायला मिळतेय. अशातच कपिल शर्मा शोमधील आणखी एका कलाकाराची एक्झिट झाल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे शोविषयी पुन्हा कलाकारांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘द कपिल शर्मा शो’ 10 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या शोमध्ये भारती आणि कृष्णा यांच्यासह अनेक जुने कलाकार दिसणार नाहीत. यावेळी कपिल एका नव्या कॉमेडियनसोबत आपला शो सुरू करणार आहे. पण यादरम्यान कपिलचा मित्र चंदन प्रभाकर म्हणजेच चंदूही शो सोडणार असल्याची बातमी समोर आलीये. याविषयी खिद्द चंदूने माहिती दिली आहे. हेही वाचा  -  Koffee With Karan 7: अनन्या पांडेसोबत ब्रेकअपवर ईशान खट्टरने सोडलं मौन, म्हणाला… पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, कपिल आणि चंदन दोघेही खूप चांगले मित्र आहेत. कपिल आणि चंदनमध्ये कोणतेही भांडण नाही. शो सोडण्यामागे कोणतेही खास कारण नसल्याचे चंदनने स्पष्ट केलं आहे. त्याला फक्त यातून ब्रेक हवा होता. चंदू चायवाला ची भूमिका साकारुन तो कंटाळला होता. चाहत्यांसाठी ही एक धक्कादायक बातमी असून त्यानं शेवटच्या क्षणी शोमधून बाहेर पडत असल्याची माहिती दिल्यानं चाहते नाराज आहेत. द कपिल शर्मा शोची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. 10 सप्टेंबरपासून दर शनिवार आणि रविवारी रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांचा सर्वात आवडता कार्यक्रम प्रसारित होणार आहे.  कपिल शर्माच्या नव्या सीझनसाठी कॉमेडी किंग कपिलनंही खास तयारी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या