JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Kushal Badrike: 'आयुष्य सुगंधी करुन टाकणारं परफ्युम...'; 'त्या' स्पेशल व्यक्तीसाठी कुशलची स्पेशल POST

Kushal Badrike: 'आयुष्य सुगंधी करुन टाकणारं परफ्युम...'; 'त्या' स्पेशल व्यक्तीसाठी कुशलची स्पेशल POST

आजकाल विनोदी भूमिकांसोबतच कुशलचा शायराना अंदाज पाहायला मिळतोय. नुकताच कुशलने एका खास व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आहे. यावेळीही त्याच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं.

जाहिरात

कुशल बद्रिके

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 नोव्हेंबर : विनोदाच्या मंचावर हास्याचे कारंजे फुलवणाऱ्या अभिनेता कुशल बद्रिकेच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. कुशल कामाच्या निमित्ताने किंवा भटकंतीसाठी जिथे जातो तिथला एक तरी असा फोटो शेअर करतो ज्यामुळे सोशल मीडियावर कुशलची हवा असते. कुशलचा फोटो, त्याचे व्हिडिओ तर व्हायरल होत असतातच पण त्याच्या पोस्टची खासियत असते ती म्हणजे त्याने लिहिलेली कॅप्शन. आजकाल विनोदी भूमिकांसोबतच कुशलचा शायराना अंदाज पाहायला मिळतोय. नुकताच कुशलने एका खास व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आहे. यावेळीही त्याच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं. या पोस्टमध्ये कुशलने त्याची बायको सुनैना सोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत त्याला सुंदर कॅप्शन दिलं  आहे. कुशलने बायकोसाठी लिहिलंय कि, ‘‘आयुष्य सुगंधी करुन टाकणारं परफ्युम कोणत्याच बाजारात मिळत नाही, अगदी टर्मिनल 2 ला सुद्धा. ते आत कुठेतरी दडलेलं असतं माणसा माणसात,मातीत कसा म्रुदगंध दडलेला असतो , पाऊस पडला की आपोआप बहरुन येतो तसच . शेवटी माणसंही मातिचीच म्हणा, सुगंधी असायचीच. फक्त पावसासारखं कोणितरी कोसळणारं हवं.’’ हेही वाचा - मराठी पाऊल पडते कुठे?; ‘सनी’ चित्रपटाचे शो रद्द झाल्याने ललित प्रभाकर संतापला कुशलने बायकोसाठी केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘वा वा कुशल’,  ‘छान लिहला आहे’ अशा शब्दात कमेंट करत चाहत्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तर एका चाहत्याने ‘अरे का असं लिहितोयस ज्याने लोक अजून प्रेमात पडतील तुझ्या’ अशी  कमेंट केली आहे. चाहत्यांच्या प्रतिसादावरून कुशलची ही  पोस्ट त्यांना चांगलीच भावलेली दिसतेय.

संबंधित बातम्या

‘चला हवा येऊ द्या’ या शोबरोबरच कुशल ‘पांडू’ सिनेमात दिसला होता. तर ‘स्ट्रगलर साला’ वेब सीरिजमध्येही कुशलच्या अभिनयाचं कौतुक झालं. दिग्दर्शक विजू माने यांच्या सोबत कुशल काही ना काही व्हिडिओ बनवत असतो. तर कुशलच्या खाजगी आयुष्यातील गोष्टीही तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अभिनेता कुशल बद्रिके नेहमीच आपल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे चर्चेत असतो. कधी आपली पत्नी सुनयनाबरोबरचा संवाद तो पोस्ट करतो. तर कधी मित्र विजू माने आणि तो मिळून काही तरी धमाल करतात. तो व्हिडिओ तो अपलोड करतो. चाहते नेहमीच कुशलच्या पोस्टची वाट पाहत असतात.

कुशलीची पत्नी सुनैना त्याच्यासारखीच एक कलाकर आहे. ती एक कथ्थक नृत्यांगना आहे.  कुशलच्या आजवरच्या प्रवासात तिचा मोठा वाटा आहे. लग्नानंतर घर आणि मुलगा यांच्या जबाबदारीमुळं तिची नृत्याची आवड मागं पडली होती. परंतू आता ती आवड सुनैना जोपासत आहे. सोशल मीडियावर ती अनेक फोटो व्हिडिओ शेअर करत असते. कुशलला देखील तिच्या या कलेचं कौतुक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या