JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bus bai bus : अभिनेत्रीसाठी तब्बल अर्धा तास थांबवलं विमान; शुभांगी गोखलेंची फिल्मी लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का?

Bus bai bus : अभिनेत्रीसाठी तब्बल अर्धा तास थांबवलं विमान; शुभांगी गोखलेंची फिल्मी लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का?

बस बाई बसच्या मंचावर अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी व्यक्तिगत आयुष्याबद्दल एक खुलासा केला आहे.

जाहिरात

शुभांगी गोखले

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

**मुंबई, 10 ऑक्टोबर :**झी मराठीवरील अल्पावधतीच लोकप्रिय झालेल्या बस बाई बस या कार्यक्रमाची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महिला राजकारण्यांनंतर बस बाई बसच्या मंचावर एकाहून एक सरस अभिनेत्रींनी हजेरी लावली आहे. त्यासोबतच मागच्या आठवड्यात आलेल्या गौरी सावंत यांचा भागही चांगलाच हिट झाला होता. राजकारण ते मनोरंजनसृष्टी अशा प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिला याठिकाणी पाहुण्या कलाकार म्हणून सहभागी होतात. दरम्यान आता या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. बस बाई बसच्या मंचावर अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी व्यक्तिगत आयुष्याबद्दल एक खुलासा केला आहे. अभिनेत्री शुभांगी गोखले आणि दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांची प्रेमकहाणी फारच हटके आहे. मोहन गोखले यांनी अल्प वयातच जगाचा निरोप घेतला होता. शुभांगी गोखले वेळोवेळी त्यांची आठवण काढताना दिसून येतात. या दोघांची लेक अभिनेत्री सखी गोखले सुद्धा आपल्या वडिलांना आजही तेवढीच मिस करते. आता बस बाई बसच्या मंचावर अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी त्यांच्या लव्हस्टोरी बद्दल एक मजेदार किस्सा सांगितला आहे. अगदी बॉलिवूडच्या चित्रपटातील प्रेमकहाणीला लाजवेल असा हा किस्सा आहे. हेही वाचा - BBM4: ‘माझं नावं कानफाट्या…’; बिग बॉसच्या घरात अपूर्वाचं नामकरण; नक्की काय घडलं पाहा बस बाई बस मध्ये शुभांगी गोखले आल्या होत्या तेव्हा एक महिला म्हणाली कि, ‘‘मी बॉलिवूडच्या रोमँटिक चित्रपटांची फॅन आहे. आपण या चित्रपटात नेहमी पाहतो कि हिरो एअरपोर्टवर धावत जात हिरोईनला थांबवतो. मला वाटत होतं हे फक्त चित्रपटातच घडतं. पण त्यानंतर मी तुमचा आणि सरांचा किस्सा ऐकला.‘‘त्यावर उत्तर देत शुभांगी यांनी तो मजेदार आणि रोमँटिक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या कि, ‘‘मोहनने मला गिफ्ट देण्यासाठी अक्ख विमान थांबवून ठेवलं होतं. तब्बल पंचवीस मिनिटं  ते विमान आमच्या दोघांसाठी थांबलं होतं.’’ शुभांगी यांनी सांगितलेला हा किस्सा ऐकून सुबोध भावे सुद्धा आश्चर्यचकित झाला.

संबंधित बातम्या

दरम्यान शुभांगी गोखले यांनी या शो दरम्यान मोहन गोखलेंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांचे पती मोहन गोखले 80 च्या दशकातील प्रसिद्ध स्टार्सपैकी एक होते. या अभिनेत्याने हिंदीसोबतच गुजराती आणि मराठी चित्रपटांमध्येही आपल्या भूमिकेने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते.

मोहन गोखले आणि  शुभांगी गोखले यांची ओळख तेव्हाची प्रसिद्ध मालिका  ‘मिस्टर योगी’ च्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघांनी लग्न केले. दोघांना एक मुलगी आहे. त्यांची मुलगी सखी गोखले देखील एक अभिनेत्री आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या मोहन गोखले यांचे  चित्रपटाच्या सेटवरच निधन झाले. 29 एप्रिल 1999 रोजी कमल हासनच्या ‘हे राम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांची कारकीर्द फार मोठी नव्हती पण अल्पावधीतच मोहन गोखले यांनी इंडस्ट्रीत मोठी छाप सोडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या