JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Boyz 3 : बेळगावमध्ये होतोय बॉईज 3' ला तीव्र विरोध; चित्रपटातील 'त्या' दृष्यांवर आहे आक्षेप

Boyz 3 : बेळगावमध्ये होतोय बॉईज 3' ला तीव्र विरोध; चित्रपटातील 'त्या' दृष्यांवर आहे आक्षेप

‘बॉईज 3’ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत असताना बेळगावातून मात्र विरोध होत आहे.

जाहिरात

boyz 3

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 सप्टेंबर : अनेक मराठी चित्रपटांनी आपली एक वेगळी छाप सोडत प्रेक्षकांमध्ये क्रेझ निर्माण केली आहे. असाच एक चित्रपट म्हणजे ‘बॉईज 2’. धैर्य, ढुंग्या आणि कबीर या ‘बॉईज’नी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावल्याचं पहायला मिळालं. आता हे तिघे पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत प्रेक्षकांना वेडं करायला. ‘बॉईज 3’  हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.  या चित्रपटाला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत असताना बेळगावातून मात्र विरोध होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या चित्रपतील एक संवाद तिथल्या काही संस्थांना खटकला आहे. त्यामुळे या चित्रपटाला तेथे विरोधाचा सामना करावा लागत आहे. ‘बॉईज 3’ मध्ये प्रतीक लाड, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे  हे तिघे पुन्हा झळकणार आहेत.   ‘बॉईज’ आणि ‘बॉईज 2’ ने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. ‘बॉईज 3’ ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. आज अखेर हा चित्रपट  प्रदर्शित झाला आहे. पण आता बॉइज 3’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेने विरोध दर्शवला असून, त्यामुळे हा चित्रपट बेळगावात प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटातील काही संवादवर आक्षेप घेतला गेल्याने बेळगावात या चित्रपटाला विरोध झाला. कन्नड भाषा, कर्नाटक पोलीस यांचा अवमान होण्यासारखे संवाद चित्रपटात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. हेही वाचा - Tu tevha tashi : अखेर सौरभसमोर उलगडणार आकाशचं सत्य;लवकरच होणार दोघांची भेट चित्रपटातील एका संवादावर कर्नाटक रक्षण वेदिकेने आक्षेप घेतला असून, यामुळे सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॉइज 3’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या चित्रपटामुळे बेळगावात कानडी मराठी वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर हे धमाल त्रिकुट दाक्षिणात्य पेहेरावात दिसून आले होते.  यात तिघांचा एक हटके अंदाज पाहायला मिळाला होता. तेव्हापासून चाहत्यांना चित्रपट बघण्याची उत्सुकता होती. तसेच या चित्रपटाद्वारे मराठी मालिकेतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री विदुला चौगुले चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे तिला या नव्या कोऱ्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या