JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Exclusive: नोरा फतेही आणि सुकेश चंद्रशेखरचं चॅट Leak, वाचा नेमकं काय झालं बोलणं

Exclusive: नोरा फतेही आणि सुकेश चंद्रशेखरचं चॅट Leak, वाचा नेमकं काय झालं बोलणं

महाठग सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrashekhar) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. जॅकलिन फर्नांडिससोबतच (Jacqueline Fernandez) अभिनेत्री नोरा फतेहीदेखील (Nora Fatehi) या प्रकरणात अडकत चालली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 डिसेंबर-   महाठग सुकेश चंद्रशेखरच्या  (Sukesh Chandrashekhar)  मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. जॅकलिन फर्नांडिससोबतच   (Jacqueline Fernandez)  अभिनेत्री नोरा फतेहीदेखील  (Nora Fatehi)   या प्रकरणात अडकत चालली आहे. नुकताच अभिनेत्री नोरा फतेही आणि सुकेश चंद्रशेखरची चॅट   (Chat Leak)  लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीलाही ठग सुकेश चंद्रशेखरनं भेटवस्तू आणि लक्जरी कार भेट दिली आहे. त्यांची एक चॅट लीक झाली आहे. लीक झालेल्या चॅटनुसार, चंद्रशेखरनं नोराला विचारलं होतं की तिला रेंज रोव्हर कार आवडते का? यावर नोरानं उत्तर दिलं, “हो, ही एक चांगली रफ यूज कार आहे. छान आहे, स्टेटमेंट कार आहे.” तेव्हा त्यानं उत्तर देत म्हटलं आहे, “मी तुम्हाला आणखी पर्याय देईन.” ही चॅट लीक होताच एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूड अभिनेत्रींच्या बाबतीत हे प्रकरण समोर येताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी याच प्रकरणात नोरा फतेहीची ईडीकडून चौकशी झाली होती. आणखी 10 अभिनेत्री संपर्कात- महाठग सुकेश चंद्रशेखरबद्दल दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. नुकताच ईडीकडून अशीच खळबळजनक माहिती समोर आली होती, की जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीच नव्हे तर तब्बल 10 अभिनेत्री सुकेशच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात आलं होतं. आतापर्यंत 3 अभिनेत्रींची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. आता आणखी कोणकोणत्या अभिनेत्रींची नावे समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (हे वाचा: Jacqueline Fernandez Net Worth: जॅकलीन फर्नांडिस आहे एका … ) जॅकलिनच्या चित्रपटासाठी गुंतवणार 500 कोटी- सुकेशनं जॅकलीनला वचन दिलं होतं, की तो तिच्यासोबत भारतातील पहिल्या वुमेन सुपरहिरो चित्रपटाची सह-निर्मिती करेल ज्यामध्ये हॉलीवूडचे VFX कलाकार असतील. मीडिया रिपोर्टनुसार, “हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रित केला जाईल. त्यानं जॅकलीनला सांगितलं होतं की ती हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीसारखीच आहे. ती सुपरहिरो चित्रपटात मुख्य भूमिकेला पात्र आहे. सूत्रानं सांगितलं की, जॅकलीनचं सुकेशशी याबद्दल फारच कमी बोलणं झालं होतं. पण तिला याबद्दल काही अंशी खात्री पटली होती. सुकेशला फिल्म इंडस्ट्रीचं खूप चांगलं ज्ञान होतं. आणि त्याला फिल्मचं बजेट, प्रोडक्शन या सगळ्याची माहिती होती. सुकेशनं जॅकलिनचं मन वळवण्यासाठी इंडस्ट्रीशी संबंधित मोठ्या लोकांची नावेही सांगितली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या