JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / केवळ रिया नाही तर हे बॉलिवूड सेलेब्ज देखील गेले आहेत जेलमध्ये, अशी झाली करिअरची अवस्था

केवळ रिया नाही तर हे बॉलिवूड सेलेब्ज देखील गेले आहेत जेलमध्ये, अशी झाली करिअरची अवस्था

अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraaboty) अशी पहिली अभिनेत्री नाही आहे, जिला जेलमध्ये जावे लागले आहे. याआधीही बॉलिवूडमधील अनेकांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे.

0108

सुशांत सिंह राजपूतच्या मृ्त्यूनंतर (Sushant Singh Rajput Death Case) समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. तिचा भाऊ शोविक देखील गजाआड आहे. रियाला एनसीबीने नारकोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सब्सटन्स कायदा (NDPS Act) अंतर्गत अटक केली आहे. सुशांत प्रकरणात वारंवार तिचं नाव समोर येत आहे. या सर्वाचा परिणाम तिच्या करिअरवर नक्कीच होणार आहे.

जाहिरात
0208

दरम्यान रिया अशी पहिली अभिनेत्री नाही आहे, जिला जेलमध्ये जावे लागले आहे. याआधीही अनेकांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. काहींचे करिअर ठप्प झाले आहे तर काही आजही स्टार आहेत.

जाहिरात
0308

संजय दत्त- या अभिनेत्याने दीर्घकाळ तुरुंगात घालवला आहे. संजय दत्तला मुंबईमध्ये 1993 दरम्यान झालेल्या साखळी बॉम्बस्फोटावेळी बेकायदेशीर हत्यारं बाळगल्याने 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. फेब्रुवारी 2016 मध्ये तो तुरुंगातून बाहेर पडला

जाहिरात
0408

फरदीन खान- फिरोज खानचा मुलगा अभिनेता फरदीन खान कोकेन बाळगण्यास आणि त्याचा सप्लाय करण्याच्या आरोपामध्ये तुरुंगात गेला होता. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याचे करिअर खास चालले नाही. 2010 मध्ये दूल्हा मिल गया मध्ये फरदीन शेवटचे मोठ्या पडद्यावर दिसला होता.

जाहिरात
0508

सलमान खान - सलमान खान हिट अँड रन केस आणि काळवीट शिकार प्रकरण या दोन्ही घटनांमुळे बराच काळ चर्चेत राहिला होता. काळवीट शिकार प्रकरणी त्याला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती, त्यावेळी त्याने काही काळ तुरुंगात घालवला होता. या दोन्ही प्रकरणांमुळे सलमानच्या करिअरवर काही विशेष परिणाम झाला नाही. आजही तो बड्या स्टार्सपैकी एक आहे

जाहिरात
0608

शायनी आहूजा- मोलकरणीने शायनीवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्याला जेलची हवा खावी लागली होती.

जाहिरात
0708

जॉन अब्राहम- नियंत्रण सुटल्याने जॉन अब्राहमने त्याच्या Hayabusa बाइकने एका महिलेच्या सायकला धडक दिली होती. यावेळी त्याला दंड ठोठावण्यात आला होता तर 15 दिवस तुरुंगात घालवावे लागले होते.

जाहिरात
0808

सूरज पांचोली- अभिनेता सूरज पांचोलीचे नाव खूप वादामध्ये अडकले होते. जिया खान आत्महत्या प्रकरणात पांचोलीला तुरुंगाची हवा खावी लागली होती. कोर्टाची पायरी देखील झिजवावी लागली होती. या प्रकरणानंतर त्याच्या करिअरवर विशेष परिणा झाला. कारण सलमानच्या 'हिरो'मध्ये डेब्यू केल्यानंतर त्याला काही विशेष काम मिळाले नाही. (फोटो सौजन्य- @soorajpancholi/Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या