JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'एम एस धोनी' ते '83'; बॉलिवूडमध्ये आजपर्यंत 'या' क्रिकेटरचे बायोपिक झाले सुपरहिट

'एम एस धोनी' ते '83'; बॉलिवूडमध्ये आजपर्यंत 'या' क्रिकेटरचे बायोपिक झाले सुपरहिट

बॉलिवूडमध्ये बायोपिकचा चालू असलेला सध्याचा ट्रेंड लोकप्रिय होताना दिसत आहे. क्रिकेटर मिताली राजच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी क्रिकेटर्सच्या आयुष्यवर बेतलेल्या या बायोपिकची तुम्हाला माहिती आहे का?

0107

बॉलिवूडमध्ये सध्या क्रिकेटरच्या आयुष्यवर बनणाऱ्या बायोपिक चित्रपटांचा जबरदस्त ट्रेंड चालू आहे

जाहिरात
0207

महिला क्रिकेट जगतातील नामवंत खेळाडू मिताली राजच्या आयुष्यावर आधारित ‘शाब्बास मिथू’ हा चित्रपट जुळी महिन्यात रिलीज होणार आहे. यात तापसी पन्नू भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या कॅप्टनची भूमिका साकारणार आहे. मिताली राजने नुकतीच तिच्या करिअरमधून रिटरमेंट घेण्याबद्दल घोषणा केली.

जाहिरात
0307

भारतीय महिला क्रिकेट संघातील सुप्रसिद्ध गोलंदाज झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर आधारित ‘छकडा एक्सप्रेस’ चित्रपटात अनुष्का शर्मा झुलनची भूमिका साकारताना दिसणार आहे. यासाठी ती क्रिकेटचं प्रशिक्षण घेताना दिसत आहे.

जाहिरात
0407

भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित ‘एम एस धोनी’ या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतने धोनीची भूमिका लीलया पेलली होती.

जाहिरात
0507

1983 च्या वल्ड कपची गाथा सांगणारा 83 हा चित्रपट आणि रणवीर सिंगने साकारलेली कपिल देव यांची भूमिका दोघांचं विशेष कौतुक झालं होतं

जाहिरात
0607

इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असणारा ‘अजहर’ चित्रपटाची सुद्धा विशेष चर्चा झाली होती.

जाहिरात
0707

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित ‘शिन ए बिलियन ड्रीम्स’ चित्रपटाचं सुद्धा विशेष कौतुक झालं होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या