ममुंबई, 02 सप्टेंबर : बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या काही बोल्ड वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या नेपोटिझमच्या वादामध्ये कंगनाने देखील उडी घेतली होती आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांवर टीका केली होती. दरम्यान कंगना आणि करण जोहर (Karan Johar) यांच्यामध्ये छत्तीसचा आकडा आहे. सार्वजनिक ठिकाणी दोघांनीही बऱ्याचदा एकमेकांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मात्र यावेळी कंगनाने करण जोहरवर टीका करताना आणखी पुढचं पाऊल उचललं आहे. तिने सोशल मीडियावर एक ट्वीट केले आहे, ज्यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केले आहे आणि करण जोहर विरोधात योग्य कारवाईची मागणी केली आहे.
कंगनाने करण जोहरला मूव्ही माफियांचा मुख्य गुन्हेगार म्हटले आहे. तिने पुढे म्हटलं आहे की, ‘@PMOIndia इतक्या सर्व जणांचे करिअर आणि आयुष्य संपवल्यानंतरही तो मुक्त आहे, आतापर्यंत त्याच्या विरोधात कोणतीच कारवाई करण्यात आली नाही आहे. आमच्यासाठी काही आशा आहे का?’ असा सवाल तिने पंतप्रधानांना विचारला आहे. ‘सर्व काही शांत झाल्यावर ही तरसांची टोळी माझ्या मागे येईल. असेही ती पुढे म्हणाली.
कंगनाने करणच्या नव्या पुस्तकाची घोषणा करणारे ट्वीट रीट्वीट करत देखील त्याचा समाचार घेतला आहे. स्वत:च्या मुलांना प्रमोट करत असल्याचा आरोप कंगनाने करणवर केला आहे. (हे वाचा- SSR Case : अंंमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी घडामोड, मुंबईत NCBचे अटकसत्र सुरू) दरम्यान याप्रकरणी ड्रग अँगल समोर आल्यानंतर कंगना रणौतने मदत करू इच्छित असल्याचे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सांगितले होते. तिने असे म्हटले होते की इंडस्ट्रमध्ये येणारे ड्रग आणि त्यासंबंधी अनेक गोष्टी माहिती असल्याचा दावा तिने केला होता. त्यामुळे ती मदत करू इच्छित असल्याचे कंगनाने म्हटले होते.