करण जोहर
मुंबई, 18 ऑक्टोबर : बॉलिवूडचा प्रसिद्ध फिल्ममेकर करण जोहर हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. करणने नुकतंच ट्विटवरला गुडबाय केलंय. अचानकपणे केलेल्या त्याच्या या घोषणेमुळे तो चांगलाच चर्चेत आला. अशातच करण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी त्याच्या चर्चेचा विषय ठरण्याचं कारण आहे त्याची सोशल मीडियावरची स्टोरी. त्याच्या स्टोरीनं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. करणने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये त्यानं लिहिलंय की, ‘मेहनत करणारे रस्त्यावर धक्के खात आहे आणि नशीबवान राजवाड्यांमध्ये राज्य करत आहे’. करणच्या या पोस्टचा अर्थ असा आहे की, जे कष्ट करतात ते काम मिळवण्यासाठी धडपडत आहेत आणि जे भाग्यवान आहेत ते राजवाड्यात राहत आहेत. करणची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
करण कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतो. त्याची कोणतीही पोस्ट असो अथवा व्हिडीओ तो नेहमीच ट्रोल होतो. तो बॉलिवूडमधील स्टारकिड्सला जास्त प्राधान्य देत असल्यानं त्यात्यावर कायम टीका होते.
दरम्यान, कामाबद्दल बोलायचे झाले तर, करण जोहर त्याच्या पुढील चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ वर काम करत आहे, जो पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत