JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 15 ऑक्टोबरला पुन्हा एकदा प्रदर्शित होणार मोदींचा बायोपिक, विवेक ऑबरॉयची आहे प्रमुख भूमिका

15 ऑक्टोबरला पुन्हा एकदा प्रदर्शित होणार मोदींचा बायोपिक, विवेक ऑबरॉयची आहे प्रमुख भूमिका

बॉलिवूड अभिनेता विवेक ऑबेरॉय (Vivek Oberoi) स्टारर पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा बायोपिक असणारा सिनेमा पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात हा सिनेमा 24 तारखेला प्रदर्शित झाला होता. आता 15 ऑक्टोबरला पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे.

0105

देशामध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर आता अनलॉक 5 मध्ये विविध गोष्टी पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान काही प्रतिबंध कायम आहेत. देशातील काही भागात थिएटर्स पुन्हा एकदा सुरू होणार आहेत.

जाहिरात
0205

अशी माहिती समोर येते आहे की, 15 तारखेला प्रदर्शित होणारा पहिला सिनेमा पीएम नरेंद्र मोदी असणार आहे. या चित्रपटात विवेक ऑबेरॉयने नरेंद्र मोदींची भूमिका साकरली होती.

जाहिरात
0305

चित्रपट समीक्षक तरण आदर्शने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये दुसऱ्यांदा प्रदर्शित होण्याची तारीख 15 ऑक्टोबर लिहिली आहे.

जाहिरात
0405

विवेक ऑबेरॉय व्यतिरिक्त या सिनेमामध्ये बोमन ईराणी, ​​मनोज जोशी, प्रशांत नारायणन, बरखा बिष्ट, जरीना वहाब आणि राजेंद्र गुप्ता देखील आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे.

जाहिरात
0505

गेल्या वर्षी मे महिन्यात हा सिनेमा 24 तारखेला प्रदर्शित झाला होता. आता 15 ऑक्टोबरला पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या