JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘मला अजूनही आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा...’ दीपिका पदुकोणला असं झालं होतं रणबीरशी प्रेम

‘मला अजूनही आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा...’ दीपिका पदुकोणला असं झालं होतं रणबीरशी प्रेम

‘मला वाटलेलं गोष्ट लंचपर्यंतच थांबेल पण नंतर आम्ही कॉफीला भेटायला लागलो, कॉफीनंतर गोष्टी केक आणि सिनेमा पाहण्यापर्यंत गेल्या.'

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 जानेवारी : बॉलिवूडकरांनी आतापर्यंत अनेक प्रेमप्रकरणं पाहिली, वाचली. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं जोडपं काही वर्षांनी एकमेकांचं तोंडही कसं पाहत नाही हेही बॉलिवूडकरांनी याची देही याची डोळा पाहिले आहे. पण याला अपवाद ठरलं ते दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरची लव्हस्टोरी. या जोडीच्या लव्हस्टोरीपासून ते ब्रेकअपपर्यंत साऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर पसरल्या. पण या सगळ्यात दोघं पहिल्यांदा कधी आणि भेटली याबद्दल फारसं कोणाला अजूनही माहीत नाही. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आणि रणबीरच्या या भेटीबद्दल जाणून घ्या. दीपिकानेच एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. दीपिका म्हणाली होती की, ‘आम्ही दोघांनी एकमेकांबद्दल फार ऐकलं होतं. आमचे मेकअप आर्टिस्ट भारत आणि डॉरिस सारखेच होते. डॉरिसला आम्ही आवडायचो. डॉरिस मला म्हणाली की, तुम्ही दोघांनी एकदा भेटलं पाहिजे.’ दीपिका पुढे म्हणाली की, ‘डॉरिस तेव्हा माझ्यासोबतच होती. तिने लगेच रणबीरला फोन लावला आणि तेव्हाच ती मला म्हणाली की, तुम्ही दोघं बोलत का नाही? ती पहिली वेळ होती जेव्हा मी आणि रणबीर फोनवर बोललो. आम्ही एकमेकांना नंबर दिले. काही दिवसांनी त्याने मला लंचसाठी विचारलं. त्या दिवशी रणबीरने मला फोन केला आणि न्यायला आला. आम्ही मुंबईतील ग्रँड हयातमध्ये लंच केला.’ वाचा : करोडोंची मालकीण असलेली दीपिका फक्त सिनेमाच नाही तर या गोष्टींमधूनही कमावते पैसा ‘मला वाटलेलं गोष्ट लंचपर्यंतच थांबेल पण नंतर आम्ही कॉफीला भेटायला लागलो, कॉफीनंतर गोष्टी केक आणि सिनेमा पाहण्यापर्यंत गेल्या. जुहूच्या पीव्हीआरमध्ये आम्ही मिस्टर बीन सिनेमा पाहिला होता. आमची पहिली भेट एवढ्यावरच थांबली नाही तर यानंतर आम्ही लाँग ड्राइव्हवर गेलो. तो नेहमी मला घरी सोडायला यायचा. 23 फेब्रुवारी 2008 पर्यंत आम्हा दोघांनाही कळलं होतं की आम्ही एकमेकांमध्ये गुंतलो आहोत.’ OMG! छोट्याशा बॅगसाठी दीपिका मोजते इतके पैसै, किंमत ऐकून बसेल धक्का

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या