2020 हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप दु:खी आणि वाईट ठरत आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीमध्येच अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे
अभिनेता इरफान खानने यावर्षी 29 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळासाठी तो कॅन्सरशी झुंज देत होता.
काही दशकं बॉलिवूडवर राज्य करणारे ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल रोजी निधन झाले. ते देखील दीर्घकाळासाठी तो कॅन्सरशी झुंज देत होते.
1 जून रोजी आपल्या खास शैलीसाठी प्रसिद्ध असणारे संगीतकार वाजिद खान यांनी जगास अलविदा केला. साजिद-वाजिद ही जोडी बॉलिवूडमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जाण्याने तर संपूर्ण इंडस्ट्री हादरली. 14 जून रोजी त्याने आत्महत्या करून स्वत:चे आयुष्य संपवले. त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर 'नेपोटिझम' या मुद्द्यावरून वादंग उठला आहे
बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शिका सरोज खान आता आपल्यात नाहीत. 3 जुलै रोजी कार्डियक अरेस्टमुळे मुंबईमध्ये मृत्यू झाला. अनेक अभिनेत्रींना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी त्यांचा प्रमुख हात होता.
बॉलिवूडचे महान अभिनेता आणि कॉमेडियन जगदीप जाफरी यांचे 8 जुलै रोजी मुंबईत निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. शोलेमधील 'सुरमा भोपाली' या भूमिकेमुळे ते विशेष प्रसिद्धीस आले.