JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 21 वर्षांनी भारताने जिंकला Miss Universeचा ताज, हरनाझच्या विजयावर लारा दत्ताची अशी होती प्रतिक्रिया

21 वर्षांनी भारताने जिंकला Miss Universeचा ताज, हरनाझच्या विजयावर लारा दत्ताची अशी होती प्रतिक्रिया

हरनाझच्या(harnaaz sandhu) विजयानंतर बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

जाहिरात

lara dutta

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 डिसेंबर: ‘मिस युनिवर्स 2021’चा (Miss Universe 2021) किताब भारताच्या हरनाझ संधूने(harnaaz sandhu) जिंकला आहे. तब्बल 21 वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला आहे. तिच्या आधी 21 वर्षांपूर्वी लारा दत्ताने(lara dutta) 2000 साली मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता. हरनाझच्या विजयानंतर बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेली लारा दत्तादेखील आहे. 21 वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा ताज जिंकलेल्या हरनाझ संधूच्या विजयावर माजी मिस युनिव्हर्स आणि चित्रपट अभिनेत्री लारा दत्ताने ट्विटरवर हरनाझचे अभिनंदन केले आहे, ‘अभिनंदन हरनाझ संधू, क्लबमध्ये आपले स्वागत आहे. यासाठी आम्ही 21 वर्षे वाट पाहिली. तुम्ही आमचा अभिमान वाढवला आहे’. अशी प्रतिक्रीया लाराने दिली आहे. त्याचवेळी मिस वर्ल्ड आणि बॉलीवूड-हॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने स्पर्धेचा व्हिडिओ शेअर केला आहे. आणि म्हटले आहे, नवीन मिस युनिव्हर्स… मिस इंडिया. 21 वर्षांनंतर ताज घरी आणणाऱ्या हरनाझ संधूचे अभिनंदन.

संबंधित बातम्या

कंगना रणौतनेही तिच्या इन्स्टा स्टोरीवर हरनाझचा स्पर्धेतील फोटो शेअर करत अभिनंदन केले आहे. करिना कपूर, नेह धुपिया यांनी सुद्धा इन्स्टा स्टोरीवरुन हरनाझला शुभेच्छा दिल्या आहेत. मिस युनिव्हर्सचा खिताब मिळवल्यानंतर हरनाझवर भारतासह जगभरातून वर्षाव केला जात आहे. अनेक सेलिब्रेटींसह राजकीय व्यक्ती, व्यावसायिकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे अभिनंदन केले आहे. यानंतर सोशल मीडियावर हरनाझ संधू असा टॅगही ट्रेंड होताना दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या