बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा काही दिवसांपूर्वीच सरोगसी द्वारे आई झाली. त्याअगोदर शाहरुख आणि आमिक खान या पद्धतीने पालक झाले होते. पण फार चर्चेत नसलेल्या अनेक कलाकारांनी यापूर्वी हा मार्ग निवडला आहे. एक मराठमोळा अभिनेताही आहे यादीत.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या दुसऱ्या मुलीचा जन्म सरोगसीद्वारे झाला. तिने तिच्या मुलीचं नाव सामिशा असं ठेवलं आहे.
2021 वर्षाच्या शेवटी प्रीती झिंटाने तिच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली. तिने नोव्हेंबर 2021 मध्ये सरोगसी द्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. ती सध्या आईपण अनुभवत आहे.
आधी दोन मुलांचे पालक असलेल्या शाहरुख खान आणि गौरी खान या लोकप्रिय कपलने 2013 साली अब्राम या त्यांच्या तिसऱ्या मुलाला सरोगसीद्वारे जन्म दिला.
प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनस यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलीला सरोगसीद्वारे जन्म दिला. तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना हा सुखद धक्का दिला होता.
अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती यांनी मे 2018 मध्ये सरोगसीद्वारे पालकत्व स्वीकारले. या जोडप्याने त्यांच्या मुलीचे नाव आद्या ठेवले.
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर मार्च 2017 मध्ये सरोगसी द्वारे दोन जुळ्या मुलांचा पालक झाला. तो एक सिंगल पॅरेंट आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध दिगदर्शक फराह खानने फेब्रुवारी 2008 सरोगसीद्वारे तिळ्यांना जन्म दिला. फराह तेव्हा 43 वर्षांची होती. ती सरोगसी एक वरदान आहे असे मानते.
प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र कपूर यांचा मुलगा अभिनेता तुषार कपूरने अविवाहित राहून सरोगसीद्वारे आपल्या लहान मुलाला लक्ष्यचा सिंगल पॅरेंट झाला. लक्ष्यचा जन्म जून 2016 मध्ये झाला. तो एकटा या मुलाला सांभाळत आहे.
तुषार कपूरची बहीण प्रसिद्ध निर्माती एकटा कपूरने देखील तुषारप्रमाणेच सिंगल मदर होण्याचा पर्याय निवडला. जानेवारी 2019 मध्ये सरोगसीद्वारे तिचा मुलगा रवीची सिंगल मदर बनली.