बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना फार सांभाळून राहावं लागतं. त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या हालचालींवर ट्रॉलर्सची वाकडी नजर असते. एरवी त्यांना निर्लज्जपणे कोणतीही आब न पाळता येणाऱ्या ट्रॉलर्सचा सामना करावा लागतो. बॉलिवूडमधील अशाच काही फेमस अभिनेत्रींना वजनावरून आणि बॉडी वरून भयानक ट्रोल केलं होतं (Bollywood actresses trolled for body)तुम्हाला माहित आहेत का? पाहा या फोटो गॅलेरीत.
1. विद्या बालन- विद्या बालनला तिच्या जाडेपणावरून कायम ट्रोल केलं जातं. यावर बॉलिवूडची रियल शेरनी उत्तम पद्धतीने पलटवार करत आत्मविश्वासाने तिचा लुक कायम ठेवत आली आहे. तिला डर्टी पिक्चर च्या काळात वजन कमी कर अश्या कमेंट आल्या होत्या.
2. नेहा धुपिया नेहाच्या प्रेग्नन्सीच्या काळात आणि त्यानंतर तिला भयानक ट्रोल केलं गेलं. तिच्या पहिल्या बाळंतपणानंतर वजन वाढल्याने तिला खूप बोललं गेलं. नेहा मात्र या गोष्टीचा फरक पडून घेत नाही.
3. सोनाक्षी सिन्हा शत्रुघ्न सिंन्हा यांच्या लेकीला लहानपणीपासून वजनावर भलत्या सलत्या कमेंट्स केल्या जातात. तिने तब्ब्ल अनेक वर्ष ट्रोलर्सचा फाजीलपणा ऐकून घेतला केला मात्र एका विडिओ मार्फत तिने तिचं मत मांडलं होतं.
4. ऐश्वर्या राय-बच्चन एका ब्युटी पॅजेंट मध्ये भाग घेणाऱ्या अभिनेत्रीला तिच्या प्रेग्नन्सीच्या काळात वजन वाढल्याने अतिशय वाईट पद्धतीच्या कमेंट्स झेलाव्या लागल्या होत्या. तिच्या पतीने मात्र तिची बाजू घेत ट्रोलर्स चा चांगला समाचार घेतला होता.
5. दीपिका पदुकोण बॉडी शेमिंग मध्ये फक्त जाडेपणावर नव्हे तर बारीक असण्यावरही बरीच अनावश्यक बडबड केली जाते. दीपिका पदुकोणला अशाच स्लिम शेमिंगचा सामना करावा लागला होता. तिला कमेंट्स मधून 'जरा खात जा' अश्या टोमण्यांना सामोरं जावं लागायचं.
6. सोनम कपूर अनिल कपूर यांच्या लेकीला बॉडी आणि चेहऱ्यावरून सारखं ट्रोल केलं गेलं. सोनम फारशी याकडे लक्ष देताना दिसत नाही.
7. झरीन खान झरीन खानचं एकेकाळी असलेलं वजन यावर तिला बरेच बोल सुनावले गेले. 'बेढब आकार का आहे? आणि वाढलेलं पोट पाहा' अश्या पद्धतीच्या कमेंट्सना तिला सामोरं जावं लागत होतं.
8. मृणाल ठाकूर मृणालला बरेचदा तिच्या पेअर बॉडी टाईपसाठी ट्रोल केलं जातं. मृणाल यावर लोकांना जशाच तसं उत्तर देते.