JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कोरोना पॉझिटिव्ह बॉलिवूड अभिनेत्रीचा अनुभव, डॉक्टरांच्या वागणुकीबद्दल म्हणाली,'शब्द नाहीत'

कोरोना पॉझिटिव्ह बॉलिवूड अभिनेत्रीचा अनुभव, डॉक्टरांच्या वागणुकीबद्दल म्हणाली,'शब्द नाहीत'

बॉलिवूड अभिनेत्री झोया मोरानी हीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. रुग्णालयात डॉक्टरांच्या वागण्याबद्दलचा अनुभव तिने सांगितलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 एप्रिल : कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री झोया मोरानी रुग्णालयात उपचार घेत आहे. टेस्टचा रिपोर्ट आल्यापासून कोकीलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात गेल्यानंतर तिनं सोशल मीडियावर हेल्थ अपडेट दिले आहेत. त्यात नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट करून हॉस्पिटलमधील अनुभव शेअर केला आहे. यात तिनं कोरोनाला रोखण्यासाठी काही उपायही सांगितले आहेत. दरम्यान, तिनं उपचार कऱणाऱ्या डॉक्टरांबद्दल सांगण्यासाठी शब्द नाहीत असं म्हटलं आहे. रुग्णांची सेवा करताना त्यांच्या चेहऱ्यावर कसलीच भीती नसते असं झोया म्हणाली. सोशल मीडियावर टाकेलली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. तिनं रुग्णालयातील अनुभव सांगताना म्हटलं की, डॉक्टर आणि नर्स कोणतीही भीती न बाळगता आमची काळजी घेत आहे. हे पाहून खूप चांगलं वाटत आहे. त्यांच वर्णन करण्यासाठी शब्द नाही. त्यांची सुरक्षा सूट घातल्यानंतरही असलेली बेचैनी दिसून येते. ते खरे हिरो आहेत. माझे डॉक्टर मला नेहमी विनोद ऐकवतात. यामुळे मला चांगलं वाटतं.

माझी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचंही त्यांनीच सांगितलं. त्यावेळी सुद्धा ते शांत आणि हसत होते. माहिती नाही त्यांनी कसं केलं. डॉक्टर सौरभ फडकरे आणि त्यांच्या टीमचे खूप आभार. मला त्यांच्यामुळे खूप सुरक्षित वाटतं असंही झोयाने सांगितलं. याशिवाय तिने यासोबत पोस्ट केलेल्या फोटोतून माहिती दिली आहे. हे वाचा : कोरोना व्हायरसचा आणखी एक बळी, प्रसिद्ध अभिनेत्रीचा उपचारांदरम्यान मृत्यू झोयाने म्हटलं की, माझे वडील, बहीण आणि मी तिघेही कोरोना पॉझिटिव्ह आहे. वडील आणि बहीण यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. लवकरच मी माझा अनुभव सांगेन. यामुळे लोकांना माहिती होईल. यामध्ये सर्दी, श्वास घेताना त्रास होतो. यावेळी प्राणायाम आणि गरम पाणी पिण्याचा फायदा होतो. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेसाठी आभार. लवकरच घरी परतेन. हे वाचा : लग्नाच्या 11 वर्षांनंतर घटस्फोट, दिया मिर्झानं सांगितली नातं तुटण्यामागची कहाणी संपादन - सूरज यादव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या