मुंबई, 23 डिसेंबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) कारला मंगळवारी (21 डिसेंबर) संध्याकाळी अपघात झाला. गुरु रंधावासोबत (Guru Randhawa) तिच्या नवीन गाण्याच्या लाँचिंगशी संबंधित कार्यक्रमात अभिनेत्रीनं हजेरी लावली होती. नोराच्या चालकानं ऑटोरिक्षाला धडक दिली (Nora Fatehi car accident) होती. अपघात झाला तेव्हा नोरा कारमध्ये उपस्थित नव्हती. असं रिपोर्टमधून समोर आलं आहे. बॉलिवूड लाइफनुसार, जेव्हा नोराच्या ड्रायव्हरनं ऑटोला धडक दिली तेव्हा लोक रस्त्याच्या मधोमध तिची कॉलर ओढताना दिसले. जेव्हा अभिनेत्रीच्या ड्रायव्हरनं ऑटोवाल्याला 1000 रुपये दिले तेव्हा तिला तेथून जाण्याची परवानगी देण्यात आली.मात्र यावेळी अभिनेत्री तेथे उपस्थित नव्हती. नोरा सध्या तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘डान्स मेरी रानी’ या गाण्यासाठी चर्चेत आहे. गाण्यातील तिच्या लूकबद्दल नोरा म्हणाली, ‘मोठी झाल्यावर मला सुंदर आफ्रिकन महिलांनी वेढले आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य असोत, माझे मित्र असोत, आफ्रिकन लोकांसारखे सुंदर कुरळे केस असलेली माझी आई असो. ती पुढे म्हणते, “आफ्रिकेत विविध त्वचेच्या टोनपासून केसांच्या वेगवेगळ्या पोतांपर्यंत सौंदर्यात बरीच विविधता आहे. मला नेहमीच कलाकार म्हणून ते सेलिब्रेट करायचं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून, मी आंतरराष्ट्रीय कलाकारांना आफ्रिकन फॅशन आणि नृत्याचं सुंदर प्रतिनिधित्व करताना पाहत आहे.नोरालाही असंच काहीतरी करण्याची इच्छा होती. ती म्हणते, ‘माझ्यामधील एका आफ्रिकनला तिच्या कलेतून ऍफ्रो सौंदर्य आणि आफ्रिकन नृत्य मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेट करायचं होतं! ‘डान्स मेरी रानी’ सोबत मला ही संधी मिळाली. मनी लॉन्ड्रिंग- तिच्या डान्स मूव्ह्सव्यतिरिक्त, नोरा २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात ईडीच्या तपासाखाली आल्यापासून ती चर्चेत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर याने नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांना आलिशान कार, हिरे आणि बॅग अशा महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. नोरा फतेही अखेरची अजय देवगण आणि संजय दत्तसोबत ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसली होती.