JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूडची बोल्ड क्वीन Malaika Aroraसोबत घडला 'Oops Moment'; फोटो झाले VIRAL

बॉलिवूडची बोल्ड क्वीन Malaika Aroraसोबत घडला 'Oops Moment'; फोटो झाले VIRAL

मलायका अरोरा तिच्या आवडीनिवडी आणि अत्यंत सुंदर लुकसाठी (gorgeous looks) ओळखली जाते. ती एक अभिनेत्री, मॉडेल आणि फिटनेस फ्रिक आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,14ऑक्टोबर- बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सुंदर आणि स्टायलिश आहेच, पण ही अभिनेत्री आपल्या फिटनेसची देखील विशेष काळजी घेते. फिगर मेंटेन राहावी यासाठी डाएट आणि एक्सरसाइजकडे ती अजिबात दुर्लक्ष करत नाही. तसंच एकापेक्षा एक सुंदर डिझाइनर ड्रेस परिधान करून ती चाहत्यांना अक्षरशः घायाळ करते. पण काहीवेळा अशा ड्रेसमुळे तिला ‘ऊप्स मोमेंट’ चा (Oops Moment) सामना करावा लागतो आणि लाजिरवाणी प्रसंग ओढवतो.

संबंधित बातम्या

मलायका अरोरा तिच्या आवडीनिवडी आणि अत्यंत सुंदर लुकसाठी (gorgeous looks) ओळखली जाते. ती एक अभिनेत्री, मॉडेल आणि फिटनेस फ्रिक आहे. तिच्या जिम लुकपासून ते रेड कार्पेट लुक (red carpet looks) पर्यंत मलायका बोल्ड ड्रेस निवड करण्यासोबतच चाहत्यांच्या नजरा खिळवून ठेवण्यात आघाडीवर असते. पण कधीकधी मलायकाला सुंदर ड्रेस घालूनही वार्डरोब मॉलफंग्शनचा (wardrobe malfunction) सामना करावा लागतो. मलायकाच्या अशाच एका ऊप्स मोमेंटबद्दल जाणून घेऊयात. (**हे वाचा:** फॉरेस्ट ग्रीन रंगाच्या साडीत खुललं Malaika Aroraचं सौंदर्य; साडीची किंमत … ) मलायका अरोरा हिचा मिस दिवा युनिव्हर्स ग्रँड फिनाले 2020 मधील रेड कार्पेटवरील बोल्ड लुक पाहून चाहते घायाळ झाले होते. तिने वन शोल्डर हाय स्लिट गाऊन घातला होता. या गाऊनवर पिवळ्या रंगाच्या अनेक शेड्स होत्या, आणि रफल्सने तयार केलेला फ्लोअर पॅटर्न हे ड्रेसचे वैशिष्ट्य होते.मलायका अरोराने तिचा लुक गोल्डन स्ट्रॅपी हील्सने पूर्ण केला होता. तसेच तिने डायमंड हँगिंग इअररिंग्स घातले होते. पण जेव्हा ती कॅमेऱ्यांसाठी पोज देण्यासाठी रेड कार्पेटवर आली, तेव्हा ती हाय स्लिट गाऊन खांद्याचा एका बाजुने खूप सैल होता. त्यामुळे तो खाली सरकला आणि तिच्यावर लाजिरवाणा प्रसंग ओढवला. पण, मलायकाने परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली आणि तिचा ड्रेस व्यवस्थित केला, व कॅमेऱ्यांसमोर पोज दिली. (**हे वाचा:** Sidharth Shukla-Shehnaaz Gill च्या शेवटच्या गाण्याचं टायटल बदललं!चाहते झाले….. ) अभिनेत्री मलायका अरोरा ही नुकतीच सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. योगा करण्यासाठी जात असताना तिने जी पोज दिली, त्यावरून ती सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. मलायका ज्या पद्धतीने चालत होती, त्यावरून तिची खिल्ली उडवण्यात आली. काही लोकांनी तर तिच्या व्हिडिओवर कमेंट करताना तिच्या चालण्याची तुलना ही डोनॉल्ड डक बरोबर केली. मलायकाला तिच्या चालण्यावरून यापूर्वीही ट्रोल करण्यात आले आहे.साध्यातील साध्या लुकला बोल्ड टच कसा द्यायचा, याचं उत्तम ज्ञान मलायका अरोराला आहे. बोल्ड लुक कॅरी करून ही अभिनेत्री जेव्हा एखाद्या कार्यक्रमात पोहोचते, त्यावेळेस तिच्या रूपावरच लोकांची नजर खिळून राहते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या