JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / महाठग सुकेशला Kiss करताना दिसली जॅकलिन; VIRAL फोटो पाहून चाहते चकित

महाठग सुकेशला Kiss करताना दिसली जॅकलिन; VIRAL फोटो पाहून चाहते चकित

बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) तिचे कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरसोबतचे (Sukesh Chandrashekhar) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 डिसेंबर-   बॉलीवूड   (Bollywood)  अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस   (Jacqueline Fernandez)   तिचे कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरसोबतचे   (Sukesh Chandrashekhar)   फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेत आहे. नुकताच एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये सुकेश जॅकलिनच्या मागे उभा आहे कारण तो त्याच्या गालावर चुंबन घेत आहे. आणि ते दोघे आरशात पाहून सेल्फी घेत आहेत.

संबंधित बातम्या

आता, एक नवीन फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये जॅकलीन सुकेशचे चुंबन घेताना दिसत आहे. आणि तो आरशात बघून सेल्फी घेत आहे. अभिनेत्रीने त्याला फोटोमध्ये घट्ट पकडले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा फोटो या वर्षी एप्रिल आणि जूनचा आहे. जेव्हा सुकेशची अंतरिम जामिनावर तुरुंगातून सुटका झाली होती. मूळचा बेंगळुरूचा रहिवासी असलेलय २७ वर्षीय चंद्रशेखरवर १५ एफआयआर दाखल आहेत. वैभवशाली जीवनशैली जगण्यासाठी त्याने बंगळुरू आणि चेन्नईमधील लोकांची करोडो रुपयांची फसवणूक केली आहे. तो सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात   (Money laundering case)   सुकेश चंद्रशेखर हा मुख्य आरोपी असून, त्याने तुरुंगातून दिल्लीतील एका व्यावसायिक महिलेला फोन करून धमकी देऊन कोट्यवधी रुपयांची खंडणी गोळा केली आहे. ईडीच्या मते, सुकेश चंद्रशेखर विरुद्ध डझनापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच या प्रकरणात मल्याळम चित्रपट अभिनेत्री लीना मारिया पॉल (Leena Mari Paul) हिचाही सहभाग असल्याचे पुरावे ईडीला मिळाले आहेत. तिच्या घरावरही ईडीने छापा टाकला. लीना पॉल सुकेशची पत्नी असून, त्याच्या अनेक गुन्ह्यांमध्ये भागीदार असल्याचे अनेक पुरावे असल्याचे ईडीनं म्हटलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नाडिसचीही चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत जॅकलिनला ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. पाच तास ही चौकशी सुरू होती. त्यांनतर आता सुकेशसोबतचे जॅकलिनचे पर्सनल फोटो समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या