मुंबई, 14ऑक्टोबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नोरा फतेही**(Nora Fatehi)** ईडी **(ED)**कार्यालयात पोहोचली आहे. 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने अभिनेत्रीला आज दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. या प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसलाही ईडीने पुन्हा बोलावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोरा फतेहीला EDने दिल्लीच्या तिहार कारागृहात बंद असलेल्या महा नटवरलाल सुकेश चंद्रशेखर याच्याकडून 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. त्याचबरोबर, ED ने जॅकलिन फर्नांडिसला 15 ऑक्टोबर रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.असे म्हटले जात आहे की ज्या प्रकारे सुकेशने इतर लोकांना त्याच्या जाळ्यात अडकवले होते, त्याच प्रकारे त्याने अभिनेत्री नोराला त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता. कोण आहे सुकेश चंद्रशेखर- मूळचा बेंगळुरू, कर्नाटकातील असलेल्या सुकेश चंद्रशेखरला हाय प्रोफाइल आयुष्य जगायचं होतं. त्यासाठी त्याने हे सर्व प्रकार केले होते. बेंगळुरू पोलिसांनी जेव्हा सुकेशला पहिल्यांदा अटक केली, तेव्हा तो फक्त 17 वर्षांचा होता. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचा मित्र बनून त्याने 1.14 कोटींची फसवणूक केली होती.