मुंबई, 24ऑक्टोबर- बॉलिवूड (Bollywood) कलाकरांचा मोठा चाहतावर्ग आहे. या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते फारच उत्सुक असतात. अशातच कलाकारांच्या बालपणाबद्दल**(Childhood)** काही जाणून घ्यायला मिळालं तर ती चाहत्यांसाठी मेजवानीच असते. काही वर्षांपूर्वी एका अभिनेत्रीने ‘मदर्स डे’ निमित्ताने आपल्या आईसोबतचा हा फोटो शेअर केला होता. पाहा तुम्हाला ओळखते का ही गोंडस चिमुकली? चला आम्ही तुम्हाला सांगतो कोण आहे ही अभिनेत्री.
सन २०१५ मध्ये या बॉलिवूड अभिनेत्रीने ‘मदर्स डे’च्या निमित्ताने आपल्या ट्विटर अकाउंटवर हा फोटो शेअर केला होता. तेव्हा हा फोटो मोठ्या प्रमाणात पसंत करण्यात आला होता. मात्र अनेक लोक असेही आहेत ज्यांनी हा फोटो अजूनही पाहिलेला नाहीय. या फोटोतील ही गोंडस मुलगी आज बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आहे.या अभिनेत्रीने आपल्या क्युट अंदाजाने तरुणाईला वेड लावलं आहे. फोटोतील ही चिमुकली इतर कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आपली आई सोनी राजदानच्या अत्यंत जवळ आहे. या दोघींमध्ये एखाद्या मैत्रिणीसारखं नातं आहे. आलिया २०१५ मध्ये भट्टने मदर्स डेच्या निमित्ताने आपला हा गोड फोटो शेअर करत आपल्या आईला शुभेच्छा दिल्या होत्या. (**हे वाचा:** HBD: अभिनेत्री बनण्यासाठी मल्लिका शेरावतने सोडलं होतं घर; हे आहे खरं नाव ) अभिनेत्री आलिया भट्ट आज बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाने फारच कमी वयात दमदार भूमिका साकारत आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. फारच कमी वयात आलियाने हे यश मिळवलं आहे. अभिनेत्री आलिया भट्टचा जन्म १५ मार्च १९९३ मध्ये मुंबई येथे झाला होता. फारच कमी लोकांनां माहिती आहे, की आलिया भट्टकडे ब्रिटनचं नागरिकत्व आहे. आलिया भट्टचा जन्म प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या घरी झाला आहे. तर सोनी राजदान ही अभिनेत्रीची आई आहे. तर प्रसिद्ध दिग्दर्शक मुकेश भट्ट तिचे काका आहेत. त्यामुळे घरात बालपणापासूनच फिल्मी वातावरण होतं. आलियाने फारच कमी वयात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिने बालकलाकार म्हणून बॉलिवूड चित्रपटात काम केलं आहे. मात्र मुख्य अभिनेत्रींच्या रूपात तिने वयाच्या १८ व्या वर्षी करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातुन पदार्पण केलं होतं. (**हे वाचा:** ‘Sardar Udham’फेम बनिता संधू 3 वर्षे होती डिप्रेशनमध्ये;अभिनेत्रीने अशी केली मात ) ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या पहिल्याच चित्रपटातून तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तरुणाईमध्ये ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. या चित्रपटात तिच्यासोबत वर्ण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रानेसुद्धा बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यांनतर आलियाने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आपल्या कारकिर्दीत तिने हायवे, राजी, डियर जिंदगी, गली बॉय, बद्रिनाथ की दुल्हनिया, टू स्टेट्स, कलंक अशा अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. तर लवकरच ती बहुचर्चित ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात एका अतिशय तगड्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रचंड चर्चा होत आहे. येत्या जानेवारीमध्ये चित्रपट रिलीज होणार आहे.चित्रपटाचं पोस्टर आणि टीजर पाहून आलिया भट्टचं प्रचंड कौतुक झालं होतं.