बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार (Bollywood hero salman khan) आहेत ज्यांना कुठल्या न कुठल्या प्रकरणात तुरुंगाची हवा खावी लागली आहे. राज कुंद्राच्या ताज्या अटकेनंतर पुन्हा एकदा बॉलिवूड सेलेब्रिटी आणि त्यांचे गुन्हे चर्चेत आहेत.
बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार सलमान खानपासून रिया चक्रवर्ती पर्यंत अनेकांनी कधी छोट्या तर कधी भयंकर गुन्ह्यांसाठी आणि आरोपांवरून जेलची हवा खाल्ली आहे. (फोटो साभार: beingsalmankhan/rhea_chakraborty/Instagram)
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफिक फिल्म प्रकरणात अटक झाली. पण दोन महिन्यांनी जामीन मिळाला आहे. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर बाहेर आलेल्या राजला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती.
दबंग अभिनेता सलमान खानला हिट अॅन्ड रन प्रकरणात सुमारे 18 दिवस तुरुंगात घालवायला लागले होते. राजस्थानच्या जंगलात काळविटाची (Black buck) शिकार प्रकरण अजूनही प्रलंबित आहेच. (फोटो साभार: beingsalmankhan/Instagram)
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्तीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर रियावर अनेक आरोप लावण्यात आले होते. (फोटो साभार:rhea_chakraborty/Instagram)
राजपाल यादवनेही तुरुंगाची हवा खाल्ली आहे. एका व्यावसायिकाने त्याच्याविरोधात 5 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. (फोटो साभार:rajpalofficial/Instagram)
'आशिकी 2' मधील 'सुन रहा है ना तू' या प्रसिद्ध गाण्याने प्रसिद्धी मिळवलेल्या अंकित तिवारीवर एका महिलेने शारीरिक शोषणाचा आरोप केला होता. मुंबई सत्र न्यायालयाने त्याला 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती. (फोटो साभार:ankittiwari/Instagram)
दिग्दर्शक विकास बहलवरही एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. विकास त्याच्या बॉम्बे वेलवेट या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गोव्याला गेला होता, तिथे हे आरोप करण्यात आले होते. (फोटो साभार:News 18)
अभिनेता संजय दत्तला (sanjay datta) आपल्या घरात अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी आणि अतिरेक्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी पाच वर्षांचा कारावास झाला होता.