JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सलमान खानच्या फार्महाऊसवर कलाकारांचे मृतदेह पुरल्याचा शेजाऱ्याचा धक्कादायक आरोप

सलमान खानच्या फार्महाऊसवर कलाकारांचे मृतदेह पुरल्याचा शेजाऱ्याचा धक्कादायक आरोप

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याच्या शेजाऱ्यात टोकाचा वाद सुरु आहे. सलमान खानने आपला शेजारी केतन कक्कड विरोधात कोर्टात खटलादेखील दाखल केला आहे.

जाहिरात

Salman Khan

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जानेवारी-   बॉलिवूड   (Bollywood)    अभिनेता सलमान खान   (Salman Khan)  आणि त्याच्या शेजाऱ्यात टोकाचा वाद सुरु आहे. सलमान खानने आपला शेजारी केतन कक्कड विरोधात कोर्टात खटलादेखील दाखल केला आहे. केतनने अभिनेता सलमान खानवर धक्कादायक आरोप केले आहेत. सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसवर चित्रपट कलाकारांचे मृतदेह पुरले असल्याचा धक्कादायक आरोप त्याने केला आहे. अभिनेता सलमान खानने काही दिवसांपूर्वी आपल्या शेजाऱ्यावर खटला दाखल केल्याचं समोर आलं होतं. केतन कक्कड हा सलमान खानचा शेजारी आहे. I Live Law च्या रिपोर्टनुसार, सलमान खानचे वकील प्रदीप गांधी यांनी गुरुवारी कोर्टासमोर केतन कक्कडच्या पोस्ट आणि मुलाखती कोर्टासमोर सादर केल्या. यावेळी त्यांनी केतन कक्कडने सलमान खानवर केलेल्या आरोपांचा खुलासा करत म्हटलं, केतन कक्कडने सलमानवर आरोप केले आहेत की सलमान खान डी गॅंगच्या आडोशाने गैरप्रकार करत आहे. त्याने सलमान खानच्या धर्मावरसुद्धा कमेंट केली आहे.तसेच सलमान खान राजकीय नेत्यांच्या अगदी जवळ असल्याचा रोप त्याने केला आहे. इतकंच नव्हे तर अभिनेता मुलांची तस्करी करत असल्याचा आणि त्याच्या फार्महाऊसवर चित्रपट अभिनेत्यांचे मृतदेह पुरले असल्याचा आरोप त्याने केला आहे. या सर्व आरोपांवर अभिनेता सलमान खानने उत्तर देत म्हटलं आहे, ‘हे सर्व आरोप त्यांच्या डोक्यातून आलेले आहेत. यात कोणतंही तथ्य नाही. या सर्व आरोपांचा कोणताच पुरावा नाही. तुम्ही माझ्या धर्माला का मध्ये घेत आहात? माझी आई हिंदू आहे माझे वडील मुस्लिम. माझ्या भावांनी हिंदू मुलींशी लग्न केलं आहे. माझ्या घरात सर्व सण साजरे होतात’. तसेच सलमानने पुढे म्हटलं आहे, ‘तुम्ही एक सुशिक्षित व्यक्ती आहात. मग एखाद्या गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीसारखे आरोप कसे करू शकता? सध्या सोशल मीडियावर जाऊन आपल्या मनातली चीड काढणं हा सर्वात सोपा मार्ग बनला आहे. तसेच सलमान खानने म्हटलं आहे, मला राजकारणात कोणतंच रस नाही. तसेच केतन कक्कडने एका युट्युब चॅनेलवर आपल्याबद्दल आपत्तीजनक वक्तव्य केल्याचं सलमानने सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या