बॉलिवूड स्टार्सचे नखरे (Bollywood stars tantrums) हा एक वेगळाच वादाचा मुद्दा आहे. अनेक मोठमोठे स्टार त्यांचे tantrums दाखवताना दिसत असतात. अशाच काही बड्या कलाकारांच्या या मागण्या (Bollywood stars demands) तुम्हाला माहित आहेत का?
बॉलिवूड कलाकार आणि त्यांचे starry tantrums हा एक चर्चेचा विषय आहे. अक्षय कुमार, ह्रितिक रोशन ते कंगना रणौत, करीना कपूर असे अनेक कलाकार आणि त्यांच्या या गजब demands तुम्हाला माहित आहेत का?
अक्षय कुमार हा अभिनेता आता एक मेगा स्टार झाला आहे. या अभिनेत्याची एक भलतीच मागणी म्हणजे रविवारी काम न करण्याची. हा अभिनेता कटाक्षाने रविवारी सुट्टी घेतो आणि त्याच अटीवर तो फिल्म साईन करतो. त्याच्यामते रविवार हा relaxation साठी असतो आणि तो वेळ कुटुंबाला देण्यासाठी आहे.
कंगना रणौत जितकी उत्तम अभिनेत्री आहे तितकेच तिचे tantrums सुद्धा जगावेगळे आहेत. तिला प्रश्नउत्तर करायला वेळ नसतो तिच्या सगळ्या गोष्टीची काळजी तिचे मॅनेजर घेतात आणि अंतिम निर्णय ती घेते. तिने 'जजमेंटल है क्या' चित्रपटासाठी तिने solo poster ची मागणी केलेली. ते मिळेपर्यंत तिने शूट सुद्धा केलं नव्हतं असं सांगितलं जातं.
बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानची एक भलतीच अट म्हणजे 'नो किसिंग पॉलिसी'. त्याच्या चित्रपटात किसिंग सीन्स द्यायला भाईजानचा नकार असतो. तसंच तो जिथे कुठे शूट करत असेल तिथे equipments परिपूर्ण gym त्याला हवी असते.
बॉलिवूडच्या बेबोचे सुद्धा बरेच नखरे पाहायला मिळतात. बेबो म्हणजे करिना कपूरची धक्कादायक अट म्हणजे ती फक्त A-lister स्टार्ससोबतच काम करायची. तिला फक्त बड्या कलाकारांसोबतच काम करायचं आहे अशी तिची मागणी आहे.
दीपिका पदुकोणला सुद्धा फक्त A-listers स्टार्ससोबतच काम करायचं आहे अशी तिची मागणी समोर येते. याच कारणाने पद्मावत चित्रपटातून विकी कौशलची हाकालपट्टी करण्यात आली असं सांगण्यात येतं.
अभिनेता ह्रितिक रोशनची सुद्धा एक भलतीच demand आहे. त्याला प्रत्येक शूटिंगच्या जागी त्याचा वेगळा शेफ लागतो. तो कायमच एक fit and fine अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या तब्येतीची आणि बॉडीची तो बारकाईने काळजी घेतो.
कतरिना कैफसुद्धा तिच्या शूटिंग बाबत जागरूक असते. ती अगदी प्रत्येक शॉट बाबत खूप परफेक्शन दाखवायचा प्रयत्न करते. फितूर सिनेमाच्या वेळी तिने काही शॉट्स पुन्हा शूट करून घ्यायची वेगळीच मागणी केलेली कारण तिने वजन कमी केलं होतं. तसंच तिला तिच्या आवडीचेच फोटोग्राफर जिथे तिथे लागतात.
प्रियांका चोप्राची सुद्धा अशीच एक वेगळी मागणी म्हणजे 'नो न्यूडिटी शॉट्स' जी ती कटाक्षाने पाळताना दिसते. ती एक ग्लोबल स्टार झाली आहे पण चित्रपटात न्यूड दृश्यांचा अंतर्भाव नसण्याकडे ती आजही लक्ष देताना दिसते.
सोन्यासारखा स्वभाव असणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सुद्धा ऑन स्क्रीन किसिंगबाबत तितकीशी उत्साही नाहीये. ती दर फिल्म साईन करण्याआधी या गोष्टीची खबरदारी घेते.