JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Bollywood Actor Replacement: गाजलेल्या बॉलिवूड फिल्म्समध्ये अगोदर दिसणार होते हे चेहरे, पाहा त्यांची विकेट काढत कोण झालं कानामागून येऊन तिखट!

Bollywood Actor Replacement: गाजलेल्या बॉलिवूड फिल्म्समध्ये अगोदर दिसणार होते हे चेहरे, पाहा त्यांची विकेट काढत कोण झालं कानामागून येऊन तिखट!

बॉलिवूड आणि रिप्लेसमेंट (Bollywood actors who got replaced) यांचं घट्ट नातं आहे. बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये अनेकदा फेरफार होऊन शेवटी वेगळ्याच व्यक्तीकडे तो चित्रपट येतो. कधी त्याचं सोनं होतं तर कधी नाही. बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत झालेल्या काही रिप्लेसमेंटबद्दल तुम्हाला कल्पना आहे का? पाहा या फोटो गॅलरीत.

0110

सध्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर येणाऱ्या चित्रपटाची आणि त्यात सावरकरांच्या मुख्य भूमिकेत असणाऱ्या रणदीप हूडाची खूप चर्चा आहे. रणदीपचा लुक रिव्हिल करणारं पोस्टर आज समोर आलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का? आधी या चित्रपटात सावरकरांच्या भूमिकेसाठी आयुष्मान खुरानाच्या नावाची चर्चा होत होती. पण आता आयुष्मानल रिप्लेस करत रणदीपने बाजी मारली आहे. बॉलिवूडमध्ये रिप्लेसमेंटचा किस्सा काही नवीन नाही. याआधी कोणकोणत्या अभिनेता-अभिनेत्रीची अशीच रिप्लेसमेंट झाली पाहूया या फोटो गॅलरीत

जाहिरात
0210

आयुष्मान खुराना-हर्षवर्धन कपूर: श्रीराम राघवन दिग्दर्शित सुपरहिट सस्पेन्स ड्रामा 'अंधाधुन' चित्रपटासाठी पहिली निवड हर्षवर्धन कपूर याची करण्यात आली होती. पण त्याने वर्कशॉप अटेंड करायला नकार दिल्याने आयुष्मानच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

जाहिरात
0310

1897 मधील सारागढीच्या लढाईवर आधारित 'केसरी' या चित्रपटात अक्षय कुमारच्या ऐवजी रणदीप हूडा असणार होता. मात्र वितरक आयत्यावेळी बॅकफूट गेल्याने अक्षयने या प्रोजेक्टमध्ये भाग घेत चित्रपटाला हिटच्या यादीत नेलं.

जाहिरात
0410

शाहिद कपूरच्या करिअरमध्ये कबीर सिंग हा महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक त्याच्या आयुष्यात आलाच नसता कारण या चित्रपटासाठी आधी अर्जुन कपूरचा विचार केला होता. पण नशीब शाहिदच्या बाजूने असल्याने हा रोल त्याला मिळाला.

जाहिरात
0510

सुप्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावरील चित्रपटात तिची भूमिका परिणीती चोप्राने साकारली. मात्र आधी सायनाच्या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरला विचारणा झाली होती. पण श्रद्धाच्या तब्येतीचं कारण झालं आणि हा रोल परिणीतीला मिळाला असं सांगितलं जातं

जाहिरात
0610

दिल धडकने दो मध्ये झोया अख्तरने आयेशा मेहरा या पात्रासाठी करीनाला विचारलं होतं मात्र तिने नकार दिल्यावर हा रोल प्रियांकाला विचारण्यात आला

जाहिरात
0710

याच चित्रपटात कबीर मेहरा पात्रासाठी रणबीरची निवड झाली होती पण काही कारणास्तव रणबीरला चित्रपट सोडावा लागला आणि यात रणवीरची एंट्री झाली.

जाहिरात
0810

दीपिका कतरीना यांच्यात सुद्धा अनेक रोल्समुळे काटें की टक्कर झाली होती. दीपिकासाठी सुपरहिट ठरलेले तिच्या करिअरमधील दोन महत्त्वाचे चित्रपट गोलियों की रासलीला रामलीला आणि यह जवानी है दिवानी हे आधी कतरिनाला ऑफर झाले होते. मात्र तिने ते रिजेक्ट केले असं सांगितलं जातं.

जाहिरात
0910

नशीब फक्त दीपिकाचंच चांगलं आहे असं नाही. यशराजची गाजलेली फिल्म जब तक है जान मध्ये कतरिनाने दीपिकाला रिप्लेस केल्याचं समजतं.

जाहिरात
1010

तब्बू- रेखा फितूर चित्रपटात तब्बूने बेगम हझरत महल ही भूमिका साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवली. आधी हा रोल रेखा यांना ऑफर झाला होता मात्र पात्राशी त्यांचं कनेक्शन जुळू न शकल्याने त्यांनी चित्रपट सोडला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या