JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / गर्लफ्रेंडसोबत हातात झाडू घेऊन सलमानचा VIDEO VIRAL, वाचा काय आहे प्रकरण

गर्लफ्रेंडसोबत हातात झाडू घेऊन सलमानचा VIDEO VIRAL, वाचा काय आहे प्रकरण

गर्लफ्रेंड लूलियासोबत आपल्या फार्महाऊस परिसरात हातात झाडू घेऊन साफसफाई करताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पनवेल, 06 जून : महाराष्ट्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. तर मुंबई-ठाण्यासह उपनगरांमध्ये झाडं उन्मळून पडल्यानं नुकसान झालं. या वादळानंतर झालेल्या नुकसानीचे अनेक फोटो समोर आले आहेत. वादळानंतर बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानच्या फार्महाऊसवरही खूप पानांचा कचरा पडला अनेक झाडांचं नुकसान झालं. या फार्महाऊसची साफसफाई करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सलमान खान सध्या पनवेलमधील फार्महाऊसवर राहात आहे. तिथे गर्लफ्रेंड लूलियासोबत आपल्या फार्महाऊस परिसरात हातात झाडू घेऊन साफसफाई करताना दिसत आहे. वादळानंतरचा हा व्हिडीओ सलमाननं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.

मिशन स्वच्छ भारत असं कॅप्शन देत सलमाननं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सलमानने कॅप्शनमध्ये त्याचे नाव स्वच्छ भारत असे ठेवले. त्याचबरोबर याला जागतिक पर्यावरण दिनाशी जोडले आहे. व्हिडीओमध्ये लुलिया वंतूरसुद्धा त्याच्याबरोबर स्वच्छता करताना दिसत आहे. हे उल्लेखनीय आहे की 22 मार्चपासून लॉकडाऊन होण्यापूर्वी हे सर्व लोक सलमानच्या पनवेल फार्म हाऊसमध्ये आहेत. सलमानचा हा व्हिडीओ आतापर्यंत 4,554,666 जणांनी पाहिला आहे. लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घेत सलमानने जॅकलिनबरोबर तेरे बिना हे गाणं रीलिझ केलं होतं. हे गाणं त्यानं स्वत: गायलं आणि दिग्दर्शित केलं आहे. तेरे बिना हे गाणं सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसवर शूट करण्यात आलं आहे. हे वाचा- ‘भारतीयांना आव्हान..’ दिग्दर्शकानं दिलं अल्पसंख्याकांसमोर गुडघे टेकण्याचं चॅलेंज हे वाचा- सलमान खानलाही बसला निसर्ग चक्रीवादळाचा फटका, फार्महाऊसचं झालं नुकसान, पाहा Photo संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या