मुंबई, 16 जून- बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेअभिनेते प्रकाश राज हे जेवढे त्यांच्या हरहुन्नरी अभिनयासाठी ओळखले जातात, तेवढंच त्यांना निर्भीडपणे आपलं मत मांडण्यासाठीही लक्षात ठेवलं जातं. प्रकाश राज सोशल मीडियावर आपली मतं व्यक्त करत असतात. यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलही केलं जातं. प्रकाश यांनी ट्विटरवर असाच एक किस्सा शेअर केला. ते मोदी विरोधक असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही याचा कसा फटका बसतो हे त्यांनी सांगितलं. महिला आणि तिची मुलगी प्रकाश यांच्यासोबत सेल्फी काढू इच्छित होत्या. पण नवऱ्याने सर्वांसमोर तिचा अपमान केला. प्रकाश यांनी लांबलचक पोस्ट लिहून ही घटना सांगितली. हेही वाचा- बॉलिवूडच्या ‘या’ 5 सुपरस्टार बाबांनी आपल्या मुलांना दिले सर्वात महागडे गिफ्ट प्रकाश यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘काश्मीरच्या गुलमर्गमध्ये मी हॉटेलमधून बाहेर पडत होतो, तेव्हा एक महिला तिच्या मुलीसोबत सेल्फी काढायला आली. मीही त्यांच्यासोबत फोटो काढला. तिचा नवरा तिथे आला आणि त्याने फोटो डिलीट करायला सांगितला. मी मोदी विरोधी असल्याचा त्याला राग होता त्यामुळे त्याने फोटो डिलीट करायला सांगितलं. तिथे उपस्थित इतर प्रवाशीही ही सर्व घटना पाहत होते.’ प्रकाश राज पुढे म्हणाले की, ‘त्या महिलेच्या डोळ्यात अश्रू होते. मी त्या माणसाला म्हणालो की, मोदी असो किंवा मी.. आमच्यापैकी कोणामुळेही तुमच्या पत्नीने तुमच्याशी लग्न केलं नाही. तुम्हाला एवढी सुंदर मुलगी दिली आणि आपलं आयुष्य तुमच्या हातात दिलं. कृपया तिच्या विचारांचा आदर करा. आपली सुट्टी आनंदात साजरी करा. माझं हे बोलणं ऐकल्यावर तो निरुत्तर झाला.’
हेही वाचा- …म्हणून शोएब अख्तरला सोनाली बेंद्रेचं करायचं होतं अपहरण, स्वतःच सांगितलं कारण प्रकाश यांनी पुढे लिहिले की, ‘मी जड अंतःकरणाने तिथून निघालो. त्यांनी माझा फोटो डिलीट केला की नाही हा विचार मी करत होतो. पण त्याचा हा घाव भरून निघेल का?’ प्रकाश राज यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. हेही वाचा- युवराज सिंग, धोनीबद्दल हा अभिनेता म्हणाला, ‘दुश्मनी गेहरी है…’ 5 हजारांसाठी उसतोड कामगाराचं अपहरण CCTV व्हिडिओ समोर