एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही जॅकी आणि आयशा यांची लव्हस्टोरी.
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) अर्थातच जग्गु दादा या नावानेही त्यांना ओळखलं जातं. अनेक चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. पण त्याच बरोबर जॅकी यांची लव्हस्टोरी ही तितकीच हटके होती. प्रसिद्ध मॉडेल आयशा दत्त (Ayesha Dutt) यांच्याशी जॅकी यांनी विवाह केला होता. पाहा कशी झाली होती जॅकीची आयशाशी ओळख.
चित्रपटातील कथेप्रमाणेच जॅकी आणि आयशा यांची लव्हस्टोरी झाली होती. आयशा १३ वर्षांची होती जेव्हा जॅकी यांनी तिला पाहिलं होतं. आणि तेव्हाच ते तिच्या प्रेमात पडले होते. पण या कहानीत मोठा ट्विस्ट होता तो म्हणजे आयशा ही एका श्रीमंत घरातील मुलगी होती. तर जॅकी हे त्यावेळी एका चाळीत राहत होते.
जॅकी यांनी सुरुवातीला तिच्याशी मैत्री केली. व तुझे मित्र आणि मी एकत्र खेळतो असं सांगून त्यांनी आयशाशी ओळख केली. आणि त्यानंतर हळू हळू ते मित्र बनले.
अनेक वर्षे त्यांनी एकमेकांची मैत्री जपली. व काही वर्षांनतर त्यांनी एकमेकांवरचं व्यक्त केलं. आयशाच्या २७ व्या वाढदिवशी त्यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर ती जॅकीसोबत चाळीत येऊन राहू लागली.