JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Harman Baweja : आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन, शुभेच्छांचा होतोय वर्षाव

Harman Baweja : आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन, शुभेच्छांचा होतोय वर्षाव

2022 हे वर्ष अनेकांसाठी खूप आनंदाचं आहे. मनोरंजन विश्वातील अनेक जोडप्यांनी यंदाच्या वर्षी गुडन्यूज दिली आहे. यातच आणखी एका अभिनेत्याच्या नावाची भर पडली आहे.

जाहिरात

हरमन बावेजा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 डिसेंबर : 2022 हे वर्ष अनेकांसाठी खूप आनंदाचं आहे. मनोरंजन विश्वातील अनेक जोडप्यांनी यंदाच्या वर्षी गुडन्यूज दिली आहे. यातच आणखी एका अभिनेत्याच्या नावाची भर पडली आहे.  बॉलिवूड अभिनेता हरमन बावेजानेही गुडन्यूज शेअर केली आहे. ‘लव्ह स्टोरी 2050’ फेम अभिनेता हरमन बावेजाच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. ही गुडन्युज समोर येताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेता हरमन बावेजा आणि त्याची पत्नी साशा रामचंदानी आई-वडील झाले आहेत. अभिनेत्याच्या पत्नीने मुलाला जन्म दिला आहे. चिमुकल्याच्या येण्यामुळे अभिनेत्याच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. हरमन आणि साशावर सध्या खूप सारं प्रेम आणि शुभेच्छा आणि आशिर्वादचा वर्षाव होत आहे. त्यांचे चाहतेही त्यांच्यासाठी खूप आंनंदी आहेत. अद्याप हरमन आणि साशाने अधिकृतरित्या याविषयी कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाहीये. त्यामुळे ते लवकरच घोषणा करतील अशी आशा चाहते व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या

डिसेंबर 2020 मध्ये हरमन बावेजा आणि साशा रामचंदानी यांनी चंदीगडमध्ये लग्न केले. हरमन एक अभिनेता आहे, तर साशा व्यवसायाने पोषण आरोग्य प्रशिक्षक आहे. ती Better Balanced Self नावाचे इंस्टाग्राम पेज चालवते, जे आरोग्य आणि निरोगीपणाचे पेज आहे. हरमन बावेजा आणि साशा रामचंदानी यांनी कोलकाता येथे एका खाजगी समारंभात लग्न केले. 21 मार्च 2021 रोजी हरमन आणि साशा यांचा शीख रितीरिवाजांनुसार विवाह झाला होता. अवघ्या वर्षभरातच या जोडप्याने त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

दरम्यान, हरमन बावेजाने प्रियंका चोप्रासोबत लव्ह स्टोरी 2050 (2008) मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. यानंतर हरमनने प्रियंकासोबत विजय, ढिशकियाँ आणि आशुतोष गोवारीकरच्या ‘व्हॉट्स युअर राशी’ सारख्या चित्रपटात काम केले पण यश मिळाले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या