JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मोठी बातमी! हृदयविकाराच्या झटक्याने बॉलिवूड अभिनेत्याचे निधन, वयाच्या 51 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! हृदयविकाराच्या झटक्याने बॉलिवूड अभिनेत्याचे निधन, वयाच्या 51 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूड अभिनेते अमिताभ दयाल(Amitabh Dayal) यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 51 वर्षीय अमिताभ दयाल यांनी आज पहाटे 4.30 वाजता मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

जाहिरात

Amitabh Dayal passed away

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेते अमिताभ दयाल (Amitabh Dayal) यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 51 वर्षीय अमिताभ दयाल यांनी आज पहाटे 4.30 वाजता मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दयाल हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा होते. दिवंगत अभिनेते ओम पुरीसोबत “कगार: लाइफ ऑन द एज” सारख्या चित्रपटात अमिताभ दयाल यांनी स्क्रीन स्पेस शेअर केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते गेल्या 13 दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. दिग्दर्शक मृणालिनी पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ दयाल यांचे काही नातेवाईक छत्तीसगडहून येणार आहेत. त्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. मिळालेल्या माहितीनुसार, 17 जानेवारी रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने ते गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता ती पॉझिटिव्हा आली. मात्र जेव्हा दुसऱ्यांदा करण्यात आली तेव्हा त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. मृत्यूआधी दयाल यांनी आपल्या इंस्टाग्रामवर हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्यांनी कधीही पराभव पत्करायचा नाही असा संदेश दिला होता. कधीही हार मानू नका..देव तुम्हाला चांगले काहीतरी देण्याची वाट पाहत आहे. लढत रहा." असे त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले होते.

संबंधित बातम्या

अमिताभ दयाल यांनी ‘विरुद्ध’ आणि ‘कागर’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच पत्नी मृणालिनी पाटील दिग्दर्शित धूम (2013), रंगदारी (2012), ये दिल्लगी (2013) यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या