1987 मध्ये बोनी कपूर (Boney Kapoor) मिस्टर इंडिया (Mr. India) हा सिनेमा करत होते. श्रीदेवींबरोबरचा त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता त्याप्रमाणे त्यांना यशदेखील मिळालं होतं.
बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर आज आपला 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 11 ऑकटोबर 1955 ला त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये झाला. मिस्टर इंडिया, जुदाई आणि नो एंट्री यांसारख्या लोकप्रिय सिनेमांची निर्मिती त्यांनी केली आहे. खरं तर कुणाच्या आयुष्यात प्रिय व्यक्ती कशी येईल हे काही सांगता येत नाही. त्याचप्रमाणे बोनी कपूर यांच्या जीवनात देखील घडलं होते. आज बोनी कपूर यांच्या वाढदिवशी आपण त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टींवर नजर टाकणार आहोत. (फोटो सौजन्य-Instagram @janhvikapoor)
1987 मध्ये बोनी कपूर मिस्टर इंडिया हा सिनेमा करत होते. हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता त्याप्रमाणे त्यांना यश देखील मिळाले होते. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने धूमाकूळ घातला होता. या सिनेमाच्या यशामुळे बोनी कपूर मोठे निर्माते म्हणून ओळखले जाऊ लागले.
तेव्हा सर्वांत टॉपची अभिनेत्री असलेल्या श्रीदेवी यांना या सिनेमात लीड रोलसाठी त्यांना घ्यायचं होतं. यासाठी ते श्रीदेवी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या चेन्नईतील घरी गेले. परंतु त्यांची या ठिकाणी भेट झाली नाही. त्यांना सात दिवसांनंतर येण्यास सांगितलं गेलं. पण आपल्याला टाळलं जात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे ते चेन्नईमध्येच राहून दररोज श्रीदेवी यांच्या घरी चक्कर मारत. अखेर एकदिवस त्यांना यामध्ये यश आलं आणि श्रीदेवी यांच्याबरोबर त्यांची मिटिंग झाली. त्यानंतर अनेक प्रयत्नांनी अखेर श्रीदेवी 'मिस्टर इंडिया' करण्यास तयार झाल्या.
मिस्टर इंडिया सुपरहिट झाल्यानंतर श्रीदेवी यांचा बोनी कपूर त्यांच्यावर विश्वास बसला. त्यानंतर 'रूप की रानी चोरों का राजा’ नावाचा आणखी एक सिनेमा त्यांनी श्रीदेवी यांच्याबरोबर बनवला. हा सिनेमा यशस्वी झाला नाही. परंतु या सिनेमादरम्यान श्रीदेवी आणि बोनी यांच्यामध्ये मैत्रीला सुरुवात झाली. जुदाई सिनेमाच्या शुटिंगवेळी श्रीदेवी यांच्या आई राजेश्वरी यांची तब्येत अचानक खराब झाली. त्यांना उपचारांसाठी अमेरिकेला हलवण्यात आले. त्यावेळी कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे बोनी कपूर श्रीदेवी यांच्याबरोबर गेले. त्या ठिकाणी चुकीचे उपचार झाल्याने श्रीदेवी यांच्या आईचं निधन झालं. पण बोनी कपूर यांनी या हॉस्पिटलवर खटला दाखल करून तो जिंकला देखील.
बोनी कपूर यांच्या निस्वार्थी स्वभावामुळे श्रीदेवी यांच्या मनात बोनी कपूर यांनी जागा बनवली. त्यावेळी त्यांचं लग्न झालं होतं. परंतु एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर अखेर त्यांनी 1996 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांना कुटुंबीयांचा मोठा विरोध सहन करावा लागला. या दोघांना दोन मुली असून जान्हवी आणि ख़ुशी अशी या दोघींची नावे आहेत. जान्हवी हिचा पहिला सिनेमा धडक याच्या प्रदर्शनाआधी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचं तिथे निधन झाले. (फोटो साभारः Instagram @janhvikapoor)