मुंबई,24ऑक्टोबर- ‘बिग बॉस मराठी’(Bigg Boss Marathi) सध्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. सर्वच स्पर्धक स्वतःला घरात टिकवून ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. या आठवड्यात ग घरात ‘जादूच्या दिव्याचा’एक टास्क देण्यात आला होता. त्यामध्ये चार स्पर्धक सोडून इतर सर्व स्पर्धक सुरक्षित झाले होते. सुरक्षित न झालेले चार स्पर्धक होते मीनल,आदिश,विकास आणि दादूस.
नुकताच ‘मराठी कलाकार विश्व्’ यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये दादूस**(Dadus)** उर्फ संतोष चौधरी (Santosh Chaudhari) घराबाहेर गेल्याचं सांगण्यात आलं आहे. अर्थातच यावेळी घरातून दादूस एलिमिनेट झाले आहेत. अशी ही पोस्ट आहे. त्यामुळे दादूसचे चाहते प्रचंड दुःखी झाले आहेत. मात्र याबद्दल अजूनही कोणतीच अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्तपूर्वी या पोस्टने चाहत्यांच्या मनात हुरहूर माजवली आहे. आज रात्री बिग बॉसच्या चावडीवर कोण घराबाहेर गेलं याचा खुलासा केला जाणार आहे. (**हे वाचा:** Bigg Boss Marathi: बॉग बॉसने दिली कठोर शिक्षा! तीन सदस्यांना केलं थेट … ) दरम्यान ‘बिग बॉस मराठी’(Bigg Boss Marathi) च्या घरात नवनवीन टास्क पाहायला मिळत आहेत. त्यामुळे साहजिकच स्पर्धकांमध्ये राडेही होत आहेत. नुकताच घरात पार पडलेल्या ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक”या कॅप्टन्सी कार्यात अनेक वादविवाद तर झालेच शिवाय धक्काबुक्की आणि नियमांचं उल्लंघनदेखील करण्यात आलं आहे. त्यामुळे बिग बॉसकडून स्पर्धकांना कठोर शिक्षा मिळाली होती. यामध्ये घरातील ३ सदस्यांना घराबाहेर जाण्यासाठी थेट नॉमिनेट(Nominate) केलं गेलं होतं.त्या तीन सदस्यांमध्ये गायत्री,स्नेहा आणि विशाल यांचा समावेश होता. तर काल झालेल्या बिग बॉसच्या चावडीत महेश मांजरेकर स्पर्धकांवर भयानक चिडलेले दिसले. त्यांनी स्पर्धकांना धारेवर धरत खडे बोल सुनावले आहेत.