JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss marathi 3च्या घरात एंट्री करताचा आदिश वैद्यला मिळाला हा मोठा अधिकार ; तीन स्पर्धकांना द्यावी लागणार परीक्षा

Bigg Boss marathi 3च्या घरात एंट्री करताचा आदिश वैद्यला मिळाला हा मोठा अधिकार ; तीन स्पर्धकांना द्यावी लागणार परीक्षा

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3 घरामध्ये जायच्या आधीच बिग बॉसने आदिशला खूप कठीण टास्क देणार आहेत. म्हणजे त्याचा खेळ घरात जाण्याअगोदरच सुरू होणार आहे असे दिसून येते आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई , 11 ऑक्टोबर : बिग बॉस मराठीच्या  **(Bigg Boss Marathi 3 )**घरात आज सीजनचा पहिला वाईल्ड सदस्य एंट्री करणार आहे. आणि घरामध्ये जायच्या आधीच बिग बॉसने आदिशला खूप कठीण टास्क देणार आहेत. म्हणजे त्याचा खेळ घरात जाण्याअगोदरच सुरू होणार आहे असे दिसून येते आहे. आदिशला (adish vaidya)  पॉवर कार्ड मिळविण्याची संधी बिग बॉस देणार आहेत आणि ती संधी त्याने स्वीकारली देखील आहे. पण  (Bigg Boss Marathi 3 Latest Update) त्याच्या बदल्यात घरातील कोणत्याही तीन सदस्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे. ती म्हणजे बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील तीन सदस्यांना रात्रभर जागून घराचे पहारेकरी बनावे लागणार आहे. आता आदिशने कुठल्या तीन सदस्यांची निवड केली ते आज कळेलच. पण त्यावरून स्नेहा वाघ त्याला टोमणे मारताना दिसणार आहे. स्नेहा आदिशला म्हणाली,  आल्या आल्या त्रास दिला तुम्ही सगळ्यांना. जसं की आमचे तीन लोकं जखमी केले. त्यावर आदिश म्हणाला “कुठले तरी तीन होणारच होते. जर तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असत ? स्नेहा म्हणाली “माझी पध्दत वेगळी असती. मी वेगळ्या पध्दतीने डील केलं असंत. म्हणजे माझ्या पध्दतीने मी डील केलं असंत. नॉट नेसेसरी की आपल्या कोणत्या गोष्टीने समोरच्याला त्रास झालाच पाहिजे, त्याचा त्रास कमी करूसुध्दा गोष्टी करू शकतो. आदिश म्हणाला, “ त्या दृष्टीने मी पूर्ण प्रयत्न केला आहे”. बघूया पुढे अजून काय काय घडत ? कोणकोणत्या गोष्टी खटकतात ?

संबंधित बातम्या

बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी आदिशने घरातील सदस्य तसेच त्याला कोण आवडते, कोणाशी मैत्री होईल ? याबद्दल थोडं महेश मांजरेकरांना सांगितलं होते. तो म्हणाला होता की, “खूप उत्सुक आहे घरामध्ये जायला. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येकजण आपल्या पध्दतीने खेळायचा प्रयत्न करतो आहे. माझा आवडता सदस्य विकास पाटील आहे. काही बाबतीत मी त्याला रिलेट करू शकतो. जय, विशाल (टास्कच्या बाबतीत) आणि मीनल हे तीन सदस्य स्ट्रॉंग प्रतिस्पर्धी आहेत असं मला वाटत. वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे घरामध्ये गेलेले स्पर्धक कधी जिंकले नाही पण मी घरामध्ये लवकर जात आहे तर ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे विजेता म्हणूनच मला बाहेर यायला नक्की आवडेल.” वाचा : Bigg Boss Marathi 3 च्या घरात नव्या सदस्याची धम्माकेदार एंट्री ; कोणत्या ग्रुपचा होणार सदस्य? कोण आहे हा आदिश वैद्य ? विविध मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रसिद्ध असलेला आदिश हा आता बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेत असल्याच्या चर्चांना उधाण आल आहे. ‘गुम है किसीके प्यार में’ या हिंदी मालिकेत आदिश सध्या महत्त्वाची भूमिका साकारत होता. मात्र नुकतीच त्याने या शोमधून एक्झिट घेतल्याचं देखील समोर आल आहे. अदिश नेहमी रेवती लेलेसोबतच्या रिलेशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. दोघेही एकमेंकासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या