मुंबई, 18 जानेवारी- बिग बॉस फेम मराठीच्या तिसऱ्या (Bigg Boss Marathi 3 ) पर्वातील स्पर्धक आदिश वैद्य (adish vaidya) त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असतो. नेहमी त्याची गर्लफ्रेंड रेवती लेलेसोबतचे काही व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच त्यानं गर्लडफ्रेंडसोबत (revati lele) एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सरळ सरळ दिसत आहे की, त्याला त्याच्या गर्लफ्रेंडने रागाने घराबाहेर हाकलून दिल आहे. आदिश वैद्यने इन्स्टावर एक फनी व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी तो अॅव्हाकाडो कापताना दिसत आहे. अचानक त्याच्यावर अॅव्हाकाडो फेकलं जातं आणि भांड्याचा आवाज होतो. यावेळी तो गंमतीने अॅव्हाकाडो ..म्हणताना दिसत आहे.यानंतर त्याची गर्लफ्रेंड देखील म्हणताना दिसत आहे की, याला घरातून बाहेर काढो..असं हा गमतीदार व्हिडिओ आहे. यावर चाहत्यांनी देखील भन्नाट कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटलं आहे की, घराची Bigg Boss , आदिश यांना निष्कासित करत आहेत..तर एकाने म्हटलं आहे की, नको काढूस घरातून बिचाऱ्याला…अशा कमेंट करत चाहत्यांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.
कुंकू टिकली आणि टॅटू’ आणि ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकांमध्ये आदिशने काम केलं आहे. त्यासोबत ‘जिंदगी नॉट आउट’, ‘बॅरिस्टर बाबू’, ‘गुम है किसीं के प्यार में’, ‘नागीण’ या हिंदी मालिकांमध्येही तो झळकला आहे. ‘गुम है किसी के प्यार में’ या लोकप्रिय मालिकेतील आदिशची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. परंतु, बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी आदिशने मालिकेचा निरोप घेतला. आपल्या हटके लूकने प्रेक्षकांना भुरळ घालणारा आदिश मराठमोळी अभिनेत्री रेवती लेले हिच्यासोबत रिलेशनमध्ये आहे. वाचा- ‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुनची पत्नी सुंदरतेत बालिवूड अभिनेत्रींना देते मात! रेवती एक उत्कृष्ट नृत्यांगना असून आदिश आणि रेवती यांनी ‘नागीण’, ‘जिंदगी नॉट आउट’ या मालिकांमध्ये एकत्र काम केलं आहे. रेवतीने कलर्स मराठी वाहिनीवरील ‘स्वामींनी’ या मालिकेत मोठया रामाबाईंची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून रेवतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.