JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'अभिजीत बिचुकले मनोरुग्ण, त्याला चपलेने हाणला पाहिजे' Megha Dhade | Abhijeet bichukle | Bigg Boss Marathi 2

'अभिजीत बिचुकले मनोरुग्ण, त्याला चपलेने हाणला पाहिजे' Megha Dhade | Abhijeet bichukle | Bigg Boss Marathi 2

बिचुकलेच्या अटकेवर बिग बॉस मराठी-1ची विजेती मेघा धाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून: बिग बॉस मराठी-2मधील स्पर्धक अभिजीत बिचुकले याला सातारा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. साताऱ्यातील एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याच्याविरुद्ध सातारा न्यायालयाने वॉरंट बजावल्यानंतर पोलिसांनी अटक केली. बिचुकलेच्या अटकेवर बिग बॉस मराठी-1ची विजेती मेघा धाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीत सारख्या स्पर्धकामुळे बिग बॉसच्या घराची प्रतिष्ठा खाली येत आहे. त्याला अटक झाली असेल तर तुरुंग हीच त्याची जागा आहे. काही दिवसांपूर्वी अभिजीतने अभिनेत्री रुपाली भोसले या स्पर्धकाबद्दल घरात आक्षेपार्ह विधान केले होते. त्याच्या या विधानानंतर भाजपच्या नगरसेविकेने अभिजीतवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहले होते. या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मेघा म्हणाल्या, अभिजीतवर अशा प्रकारची कारवाई झाली असेल तर मला त्याचा सर्वाधिक आनंद आहे. बिग बॉसच्या घरातील ही जी व्यक्ती आहे ती त्याच लायकीची आहे. गेल्या 3 दिवसांपासून या व्यक्तीमुळे माझे रक्त सळसळत आहे. तो ज्या पद्धतीने घरात वागतोय आणि रुपालीबद्दल त्याने जे वक्तव्य केले आहे, ते सर्व लाज वाटणारे आहे. अभिजीत सारखा माणूस त्या घरात असे ही गोष्टी त्या घरासाठी कलंक असल्यासारखी आहे. Bigg Boss Marathi च्या घरातून अभिजीत बिचुकलेला अटक अभिजीत या घराची शान घालवतोय. स्वत:ला नेता म्हणणाला हा स्वयंघोषित नेता आहे. त्याने आजपर्यंत एकही निवडणूक जिकंली नाही. चार टवाळ पोरांना सोबत घेतल्यामुळे कोणी नेता होत नाही. स्वत:च्या घरात 400 नोकर आहेत, असे सांगणाऱ्या अभिजीतच्या घरी न्यूज 18 लोकमतने जावे आणि चेक करावे. हा लोकांची घरे बळकावून तेथे राहणारा ढोंगी माणूस आहे. बिग बॉसच्या घरात अभिजीतने दावा केला होता की मी 25 लाख रुपये चपलेवर ठेवतो. त्यावर बोलताना मेघा म्हणाल्या की, अशा माणसाला चपल्लेने हाणले पाहिजे. एक मनोरुग्ण असलेल्या अभिजीत जागा तुरुंगात आहे, असेही मेघा म्हणाल्या. अभिजीत अश्लील शिव्या देतो. हा शो केवळ पौढ व्यक्ती बघत नाहीत तर लहान मुलं देखील पाहतात. अभिजीत सारख्या व्यक्तीमुळे शोची प्रतिष्ठा खाली येत आहे. VIDEO: बिचुकलेसारख्या लोकांना चपलेनं मारलं पाहिजे, मेघा धाडे संतापली

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या