JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / BBM4: महेश मांजरेकर सगळ्या सदस्यांना आणणार वठणीवर, बिग बॉसच्या चावडीवर काय घडणार?

BBM4: महेश मांजरेकर सगळ्या सदस्यांना आणणार वठणीवर, बिग बॉसच्या चावडीवर काय घडणार?

‘बिग बॉस मराठी 4’ ची सोशल मीडियावर चांगलीच क्रेझ पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस बिग बॉस रंजक होत चालला आहे.

जाहिरात

बिग बॉस 4

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 ऑक्टोबर : ‘बिग बॉस मराठी 4’ ची सोशल मीडियावर चांगलीच क्रेझ पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस बिग बॉस रंजक होत चालला आहे. शिवाय स्पर्धकांमध्येही जोरदार वाद-विवाद पहायला मिळत आहे. त्यामुळे बिग बॉसची चर्चा सर्वत्र पहायला मिळत आहे. प्रेक्षकांना आतुरता असते ती महेश सरांच्या आठवड्याच्या चावडीची. या चावडीमध्ये स्पर्धकांनी आठवडाभर केलेल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींची शाळा घेतल्यातं पहायला मिळतं. अशातच दुसऱ्या चावडीचा प्रोमो समोर आला आहे. कलर्स मराठीच्या इन्स्टाग्रामवर चावडीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवरुन पहायला मिळतंय की महेश सर आठवड्याभरात झालेल्या सगळ्या गोष्टीवर स्पर्धकांना वठणीवर आणण्याचं काम करणार आहे. त्यामुळे या चावडीत महेश सरांच्या तावडीत कोण कोण स्पर्धक सापडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या

मागच्या आठवड्याच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी अपूर्वाची चांगलीच शाळा घेतली. तरीही या आठ्वड्यात सुद्धा तिचा आवाज काही कमी नाही. या आठ्वड्यात देखील तिने किरण माने,विकास सावंत यांच्यावर आवाज चढवला. त्यामुळे महेश सर यावर काय शाळा करणार हे पाहणंही उत्सुकतेचं असणार आहे. अपूर्वाशिवाय अनेक स्पर्धकांना महेश सरांनी मागच्या चावडीत झापलं होतं.

घरातील पहिला आठवडा स्पर्धकांच्या आरडा ओरड्यानं चांगलाच गाजला. या आठवड्यात थोड खेळीमेळीचं वातावरण घरात होतं. पण स्पर्धकांमध्ये छोटे मोठे वाद चालूच असतात. बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यात समृद्धी घराची कॅप्टन झाली होती. तर या आठवड्यात रोहित शिंदे घराचा दुसरा कॅप्टन झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या