JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss 3 Marathi Grand Finale : महेश मांजरेकरांकडून मोठी घोषणा, विजेता होण्यापूर्वीच दिली 'ही' ऑफर

Bigg Boss 3 Marathi Grand Finale : महेश मांजरेकरांकडून मोठी घोषणा, विजेता होण्यापूर्वीच दिली 'ही' ऑफर

बिग बॉस मराठी सीजन तीनच्या शेवटच्या तीनमध्ये जय दुधाणे(Jay Dudhane ) , विकास पाटील(Vikas Patil) आणि विशाल निकम(Vishal Nikam) यांचा समावेश आहे. यातील विजेता एकच होणार आहे. मात्र यापूर्वी महेश मांजरेकरांनी एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे जय दुधाणे याला सिनेमाची ऑफर दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 डिसेंबर- बिग बॉस मराठी सीजन तीनचा (bigg boss marathi 3 )आज फिनाले आहे. आज टॉप पाईव्हमधून (Bigg Boss 3 Marathi Grand Finale ) मीनल शहा (Meenal Shah) आणि उत्कर्ष शिंदे(Utkarsh Shinde) घराबाहेर पडला आहे. आत बिग बॉसला टॉप 3 मिळाले आहेत. यामध्ये जय दुधाणे**(Jay Dudhane )** , विकास पाटील**(Vikas Patil)**  आणि विशाल निकम**(Vishal Nikam)** यांचा समावेश आहे. यातील विजेता एकच होणार आहे. मात्र यापूर्वी महेश मांजरेकरांनी एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे जय दुधाणे याला सिनेमाची  ऑफर दिली आहे. या सिनेमाचे नाव शनिवारवाडा असणार असल्याची घोषणा  देखील महेश मांजरेकरांनी या घरात केली आहे. त्यामुळे विजेता होण्यापूर्वीच खऱ्या अर्थाने जय दुधाणे (Jay Dudhane )विजेता झाला आहे असं म्हटले तरी वावगे वाटायला नको. बिग बॉस मराठीचे घर प्रत्येकाला काय ना काय तरी देत असते. तसंच जय दुधाणे याला सिनेमा मिळवून दिला आहे. त्यामुळे घऱातच त्याला काम मिळण्यास सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे हे घर प्रसिद्धी तर देतेच पण लोकप्रियता व नाव देखील देते. या शोच्या माध्यमातून आपला खऱा चेहरा समोर येत असतो.  खोटे मुकवटा चढवून या घऱात वावरता येत नाही आणि घऱात हा चेहर कधी ना कधी समोर येतोच. आता शेवटचे तीन स्पर्धक राहिले आहेत आणि यापैकी कोण विजेता होणार व या ट्रॉफीवर आपले नाव कोरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाचा-बिग बॉस मराठीमध्ये बॉईजची धमाल, विकास, विशाल, जय कोण होणार विजेता? जय दुधाणे कोण आहे ? जय दुधाणे याने बिग बॉस मराठी शो करण्यापूर्वी हिंदी रिअॅलिटी स्प्लिट्सविला हा शो देखील केला आहे. या कार्यक्रमातून त्याला प्रसिद्धी मिळाली. जय एक उद्योगपती आहे व त्याला महागड्या चारचाकी गाडींचा शोक आहे. यासोबतच त्याला फिटनेसची देखील आवड आहे.

संबंधित बातम्या

जयला बिग बॉसच्या घरात जाण्याआधी त्याला, तू घऱात जाण्यासाठी काय तयारी केली आहेस आणि त्याची खेळासाठी काय स्ट्रॅटेजी आहे असे माध्यम प्रतिनिधींकडून विचारण्यात आले होते. यावर जय म्हणाला होता की, ’’ जर गेमसाठी कनेक्शन बनवायची गरज पडली तर तेही करेल’’ असे म्हटले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या