अंकित-प्रियांका
मुंबई, 16 ऑक्टोबर- ‘बिग बॉस’ सोळाचा दुसरा आठवडादेखील धमाकेदार होता. गेल्या काही एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरात वादविवाद पाहायला मिळाले. घरचं वातावरणही थोडं तापलेलं दिसून आलं. घरातील स्पर्धकांमध्ये लहान-लहान गोष्टीवरुन राडे झाले. शोमध्ये अर्चना गौतम, शालीन भनौत आणि प्रियांका चहर चौधरी यांच्यासह अनेक स्पर्धक एकमेकांशी पंगा घेताना दिसून आले. आठवड्याच्या शेवटी घरात पहिलं एव्हिक्शनदेखील पाहायला मिळालं. दरम्यान एका जोडीने प्रेमाचा वर्षावदेखील केला. नुकतंच बिग बॉसच्या घरात बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांनी उपस्थिती लावली होती. या दोघांनी आपल्या आगामी ‘थँक गॉड’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये सहभाग घेतला होता. या दोघांनी होस्ट सलमान खान आणि स्पर्धकांसोबत धम्माल मस्तीदेखील केली. या दोघांनी घरातील स्पर्धकांना विविध प्रश्न विचारले. तसेच त्यांना मजेशीर टास्कसुद्धा दिले. दरम्यान बिग बॉस 16 चे लव्ह बर्ड्स आणि ‘उडारिया’ फेम अंकित गुप्ता आणि प्रियांका चहर यांना रोमँटिक डान्स करण्याचं चॅलेंजसुद्धा दिलं होतं. **(हे वाचा:** Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात झालं पहिलं एव्हीक्शन; दुसऱ्याच आठवड्यात ही सेलेब्रिटी OUT ) नुकतंच प्रसारित झालेल्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये बिग बॉस 16 चे स्पर्धक अंकित गुप्ता आणि प्रियंका चहर चौधरी एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसून आले. दोघेही एकमेकांसोबत रोमँटिक डान्स करताना पाहायला मिळाले. यावेळी बिग बॉसच्या घरात पाहुणे म्हणून आलेले सेलिब्रेटी रकुल प्रीत सिंह आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनीसुद्धा सलमानसोबत डान्सचा आनंद घेतला. या सर्वांनी ‘मणिके मांगे’ या गाण्यावर धम्माल केली.
घरात पहिलं एव्हिक्शन- बिग बॉसच्या घरात दुसऱ्या आठवड्यामध्ये पहिलं एव्हिक्शन पाहायला मिळालं आहे. बिग बॉस 16 च्या पहिल्याच एव्हिक्शनमध्ये ‘उतरन’ फेम अभिनेत्री श्रीजीता डे घराबाहेर गेली आहे. श्रीजीता पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्याने तिचे चाहते निराश झाले आहेत.या आठवड्यात घरातील 5 सदस्य नॉमिनेट झाले होते. यामध्ये शालिन भनौत, टीना दत्ता, एमसी स्टॅन, गोरी नागोरी आणि श्रीजीता डे यांचा समावेश होता.
यंदाच्या सीजनबाबत सांगायचं झालं तर, यावेळी शोमध्ये अब्दू रोजिक, टीना दत्ता, साजिद खान, श्रीजिता डे, मान्या सिंग, सुंबुल तौकीर खान, शिव ठाकरे, सौंदर्या शर्मा, शालिन भनौत, गौतम सिंग वीज, अर्चना गौतम , एमसी स्टॅन, अंकित गुप्ता, प्रियंका चहर चौधरी, निम्रत कौर अहलुवालिया आणि गौरी नागोरी या कलाकारांनी सहभाग घेतला आहे.