JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मान्या सिंग बनली Bigg Boss 16 ची पहिली कन्फर्म स्पर्धक; नेमकी आहे तरी कोण?

मान्या सिंग बनली Bigg Boss 16 ची पहिली कन्फर्म स्पर्धक; नेमकी आहे तरी कोण?

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ची सध्या तुफान चर्चा आहे. लवकरच ‘बिग बॉस’चा 16 वा सीजन सुरु होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 सप्टेंबर-   छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ची सध्या तुफान चर्चा आहे. लवकरच ‘बिग बॉस’चा 16 वा सीजन सुरु होणार आहे. 1 ऑक्टोबरला बिग बॉसचा ग्रँड प्रीमियर होणार आहे. मात्र शो सुरु होण्याआधीच त्यातील स्पर्धकांची बरीच चर्चा होत आहे. यंदा बिग बॉसच्या घरामध्ये कोणकोणते सेलिब्रेटी सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, फेमिना मिस इंडिया 2020 ची उपविजेती मान्या सिंग यावेळी एक स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मान्या सिंग ही यंदाच्या ‘बिग बॉस’ची पहिली कन्फर्म स्पर्धक बनली आहे. मान्याच्या बिग बॉस एन्ट्रीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरी या बातम्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. सध्या मान्या सिंग कोण याबाबत अनेक लोक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत . सध्या सोशल मीडियावर मान्या सिंग प्रचंड चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो आहे. बॉलिवूड दबंग सलमान खान बऱ्याच दिवसांपासून हा शो होस्ट करत आहे. या शोमध्ये प्रत्येक वेळी फक्त देशातीलच नव्हे तर जगभरातील अनेक प्रसिद्ध स्टार्स सहभागी झाले आहेत. ‘बिग बॉस’ने प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकरांना जवळून जाणून घेण्याची संधी दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार असं सांगितलं जात आहे की, यंदाचा बिग बॉस सीजन इतर सीजनपेक्षा फारच हटके असणार आहे.त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. **(हे वाचा:** Tejasswi Prakash : आधी आलिशान कार आणि आता गोव्यात घर; इतक्या कमी वयात तेजस्वीच्या कमाईची होतेय चर्चा ) रिपोर्टनुसार असं सांगितलं जात आहे की, बिग बॉसचा शोचा प्रीमियर अर्थातच पहिला एपिसोड दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. त्याचा दुसरा भाग 2 ऑक्टोबरला प्रसारित होणार आहे. यासोबतच ‘बिग बॉस 16’ च्या प्रीमियर एपिसोडमध्ये सलमान खानसोबत शहनाज गिल दिसणार असल्याची चर्चा आहे. साहजिकच त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. सध्या प्रेक्षकांना बिग बॉसच्या नव्या सीजनची प्रतीक्षा .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या